गुरुपौर्णिमेचे अवचित साधून विविध सांस्कृतिक कार्यक्रमासह आध्यात्मिक मार्गदर्शन सोहळा पार
जीवन विद्या मिशन बेळगाव शाखेच्या वतीने दरवर्षाप्रमाणे यावर्षीही कृतज्ञता दिन म्हणून सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. बेळगाव शहरातील मराठा मंदिर येथे जीवन विद्या मिशन तर्फे गुरुपौर्णिमेचे अवचित साधून विविध सांस्कृतिक कार्यक्रमासह आध्यात्मिक मार्गदर्शन सोहळा पार पडला.
सकाळपासूनच विविध सद्गुरूंचे शिष्य अर्थात नाम धारक वेगवेगळे सद्गुरु च्या आधारित भजन व विविध सांस्कृतिक कार्यक्रम ही यावेळी पार पडल्या भरगच्च भरलेल्या या कार्यक्रमांमध्ये दुपारी गुरुवंदना कार्यक्रम गुरुपूजा कार्यक्रम सह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या मार्ग तत्त्वावर चालणारे जवळपास 5000 पेक्षा जास्त बेळगाव शहर व उपनगरामध्ये नामदारक सध्या कार्यरत आहेत.
ये ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव व सर्वांचं भलकर कल्याणकर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे अशी ईश्वर प्रार्थना सकाळपासूनच अगदी उत्साहाने गुरुपौर्णिमेनिमित्त केली जात होते या कार्यक्रमाला मुंबई डोंबिवली वरून व्याख्यानकार म्हणून शैलेश रेगे यांनी शांती सुखाचा मार्ग देणारे सद्गुरु वामनराव पै यांनी लिहिलेल्या ज्ञानाचा अनुभव कथन केला व उपस्थित नामधारकांना मंत्रमुग्ध केले त्यावेळी बेळगाव शाखेचे प्रमुख शंकर बांदकर ,मराठा मंदिर चे माजी अध्यक्ष शिवाजीराव हंगेरगेकर, अध्यक्ष अप्पासाहेब गुरव,रमेश मुदगेकर ,प्रकाश पाटील, सहा इतर प्रमुख पाहुणे उपस्थित होते.