रविवारी बजरंग दलच्या वतीने शौर्य संचालन
बेळगाव: विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने रविवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ रोजी बजरंग दलाच्या संचालन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाची माहिती बेळगाव येथील कन्नड साहित्य भवन मध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आले.
देश धर्म रक्षणासाठी सर्व हिंदूंनी एकत्र येणे गरजेचे आहे यासाठी विश्व हिंदू परिषद अनेक कार्यक्रम करत असते. त्यातील एक भाग म्हणून रविवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजन करण्यात आले आहे. शौर्य संचालन रविवारी दुपारी ३ वाजता सरदार मैदानातून सुरुवात होऊन धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज उद्यान महाद्वार रोड बेळगाव येथे संपन्न होईल त्यानंतर सायंकाळी ५ वाजता जाहीर सभेनंतर कार्यक्रमाची सांगता होईल.
या कार्यक्रमाचे दिव्य सानिध्य जगद्गुरु सदाशिवानंद महास्वामी (श्री शिवानंद ब्राह्मनमठ गडग) यांच्या उपस्थितीत होणार आहे. तसेच या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून बजरंग दलचे राष्ट्रीय संयोजक माननीय श्री नीरज डौनेरिया हे उपस्थित राहणार आहेत.
या पत्रकार परिषदेला विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा कार्यदर्शी आनंद करलिंगन्नवर,विश्व हिंदू परिषदेचे चिक्कोडी अध्यक्ष डॉ. आर.के. बागी , बजरंग दल जिल्हा संयोजक संतोष मादिगर, बजरंग दल चिक्कोडी विभाग संयोजक लक्ष्मण मिसाळे, जिल्हा संयोजक बजरंग दल चिक्कोडी संतोष हत्तरकी उपस्थित होते.