साधना क्रीडा संघाच्या वतीने नूतन महापौर श्री मंगेश पवार यांचा सत्कार
नुकताच पार पडलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर निवडणूकीमध्ये श्री मंगेश पवार यांची महापौर पदी निवड झाली. या निमित्ताने साधना क्रीडा केंद्र संघाच्यावतीने अभिनंदन करून, त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच साधना क्रीडा केंद्र संघाच्या वतीने होणाऱ्या 18,19 व 20 एप्रिल 2025 मध्ये राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी नूतन महापौर श्री मंगेश पवार यांनी या स्पर्धेसाठी सर्व प्रकार मदतीचे आश्वासन दिले. *गरिबांचे महाबळेश्वर तापले*
तसेच सहकार्य करू असेही त्यांनी सांगितले. या सत्कार समारंभावेळी साधना क्रीडा केंद्र संघाचे अध्यक्ष संजय बेळगावकर, उपाध्यक्ष अशोक हलगेकर, सेक्रेटरी सतीश बाचीकर, सहसेक्रेटरी शैलेज बांदिवडेकर तसेच ज्येष्ठ सदस्य प्रकाश देसाई, प्रकाश नंदिहळी, एएसआय श्री चिन्नास्वामी, विवेक पाटील व इतर सदस्य उपस्थित होते.