बेळगांव:इंडियन मेडिकल असोसिएशन बेळगाव शाखेच्या वतीने क्लब रोडवरील बिम्स हॉस्पिटल कंपाऊंडमधील परिसरात रोपे लावून वन महोत्सव साजरा करण्यात आला. अध्यक्ष डॉ.रवींद्र अनगोळ यांच्या हस्ते हॉस्पिटल परिसरात रोपे लावण्यात आली. यावेळी सचिव डॉ सुश्रुथ कामोजी, डॉ राजश्री अनगोळ, डॉ देवगौडाह इमागौदनावर उपस्थित होते.
बेळगाव शहराचे हिरवे गार वातावरण व सौंदर्य वाढविण्याच्या उद्देशाने पर्यावरण दिनाचे औचित्य साधून रोपे लावण्यात आली.”निसर्गाचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे” असे सांगून डॉ. अनगोळ यांनी सभोवतालचे वातावरण हिरवेगार ठेवण्यासाठी प्रयत्न करणे व लावलेल्या रोपांच्या संरक्षणासाठी सदस्यांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत असे सांगितले.