जिल्ह्यातील 8 तर राज्यातील 21 साखर कारखान्यावर खात्याच्या अधिकाऱ्यांनी टाकले छापे
बेळगाव जिल्ह्यातील आठ साखर कारखान्यासह राज्यातील एकूण एकवीस साखर कारखान्यावर साखर खात्याच्या अधिकाऱ्यांनी वजनाबद्दल तक्रारी आल्या असल्याने धाडी टाकल्याने साखर उद्योगात खळबळ उडाली आहे.
सकाळी सात वाजता एकाच वेळी सगळ्या साखर कारखान्यावर धाडी घालण्यात आल्या.
साखर कारखान्यात उसाच्या वजनात घोटाळा होत असल्याबद्दल तक्रारी करण्यात आल्या होत्या.त्याची दखल घेऊन या धाडी टाकण्यात आल्या आहेत.साखर कारखान्यात होत असलेल्या उसाच्या काटेमारीबद्दल मंत्री शंकर पाटील यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या.या तक्रारींची दखल घेतली जाईल असे साखर मंत्र्यांनी सांगितले होते.त्यानुसार या धाडी घालण्यात आल्या आहेत.
बेळगाव ८,विजापूर ४,बागलकोट ४,बीदर २,गुलबर्गा २ आणि कारवार १ अशा साखर कारखान्यावर धाडी घालण्यात आल्या आहेत.साखर आयुक्त शिवानंद केलकेरी यांच्या नेतृत्वाखाली या धाडी घालण्यात आल्या आहेत.धाडीत साखर खात्याचे ,वजन माप खात्याचे,वाहतूक खात्याचे अधिकारी आणि पोलीस सहभागी झाले होते.
अरिहंत शुगर्स इंडस्ट्रीज,जैनापुर,ता.चिकोडी,अथणी शुगर्स लि.अथणी,बेळगाव शुगर्स प्रा. लि. हुदली,हर्ष शुगर्स लि. सौंदत्ती,लैला शुगर्स खानापूर,शिरगुप्पी शुगर्स वर्क्स लि.शिरगुप्पी,वेंकटेश्वर पावर प्रोजेक्ट लि. बेडकीहाळ ,विश्र्वराज शुगर्स इंडस्ट्रीज, बेल्लद बागेवाडी अशा बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखान्यावर धाडी पडल्या आहेत.