1986 मध्ये कर्नाटक सरकार तर्फे मराठी भाषिकवर कन्नड सक्ती लादली होती या विरोधात संपूर्ण सीमा भागात तीव्र संताप पसरला होता या कन्नड सक्ती विरोधात सीमा भागातील मराठी तरुणाने एकत्रित येऊन आंदोलन आपल्या हाती घेतले होते या आंदोलनात कर्नाटक सरकारने गोळीबार करून आपल्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या निष्पाप मराठी तरुणांचे जीव घेतले होते त्या दिवशीपासून संपूर्ण सीमा भागातील जनता एक जून हा हुतात्मा दिन म्हणून गांभीर्याने पाळत आलेली आहे यावर्षी सुद्धा सीमा भागातील संपूर्ण मराठी भाषिकांनी एक जून गांभीर्याने पाळून कडकडीत हरताळ करावे या एक जून रोजी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाजवळ हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी संपूर्ण खानापूर तालुक्यातील मराठी भाषिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आव्हान खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री सुयाजी पाटील व खानापूर युवा समितीचे अध्यक्ष श्री धनंजय पाटील यांनी केले
यावेळी खानापूर समितीचे अध्यक्ष श्री सूर्याजी पाटील,युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील,माजी तालुका सभापती सुरेश देसाई, नंदगड दक्षिण विभाग सोसायटीचे अध्यक्ष पी.एच. पाटील,लक्केबैल पिकेपीएस चे माजी अध्यक्ष रवी पाटील, दत्तू कुट्रे व राजू पाटील उपस्थित होते.