बेळगांवच्या आंतरराष्ट्रीय (श्रीलंका) दिव्यांग थ्रोबाॕल स्पर्धेच्या विजयी खेळाडूंचा सन्मान व कौतुकसंध्या. –
भारत श्रीलंका नेपाळ व भूतान या चार देशातील दिव्यांंग खेळाडूंची थ्रोबाॕल स्पर्धा प्रथमच कोलंबो (श्रीलंका) येथे जुलै 23 ते 26 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आली होती. निवड करण्यात आलेल्या दोन्ही (पुरूष व महिला) संघामध्ये मिळून बेळगांवचे सात खेळाडू सहभागी झाले होते.
या स्पर्धेत 2 भारतीय (पुरूष व महिला) संघांनी नेपाळ, भुतान व श्रीलंका या तिन्ही देशावर आपल्या भारतीय संघानी पुरूषांच्या व महिलांच्या दोन्ही गटात विजय मिळवून बेळगावचे नाव मोठे केले.
प्रथमच आंतरराष्ट्रीय पॕरा थ्रोबाॕल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या बेळगांवच्या या खेळाडूंनी मदतीसाठी आवाहन केले होते. त्यानूसार बेळगांवच्या शास्त्रीनगर येथील श्री गुजराती नवरात्री उत्सव मंडळाच्यावतीने एक सामाजिक बांधिलकी म्हणून रूपये 25,000 ची मदत केली होती. भारतीय थ्रोबाॕल संघानी दोन्ही स्पर्धा जिंकून आल्याने बेळगांवच्या विजयी खेळाडूंच्या सन्मानाप्रीत्यर्थ गुजरात भवन येथे एक छोटेखानी समारंभ आयोजित करून त्यांचे कौतुक करण्यात आले.
यासमयी गुजरात नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष रमेश लद्दड यांनी मंडळाच्या वतीने विजयी स्पर्धकांसह कोचचे अभिनंदन केले व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महांतेश होंगल, मनिषा होंगल, सुरज धामणेकर, सुरेश कुंभार, मन्सूर मुल्ला, ईराण्णा होंडपण्णवर व संघ व्हिएस पाटील यांना श्री लखमसीभाई लद्दड,श्री धरमसीभाई भानूशाली (भद्रा), अध्यक्ष श्री रमेशभाई लद्दड, सचीव श्री विजय डी भद्रा, कोषाध्यक्ष श्री पंकजभाई शहा यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी सुरज धामणेकर व मनिषा होंगल यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या स्पर्धात्मक आयुष्यातील चढउतार, केलेला संघर्ष व खेळाडूंचे अनुभव उपस्थितांना कथन केले. खेळाडूंच्यातर्फे गुजरात नवरात्र उत्सव मंडळाने संघाला आंतरराष्ट्रीय स्पर्धेला कोलंबो (श्रीलंका) ला जाण्यास आर्थिक मदत केल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. संघचालक (कोच) व्हि एस पाटील यांनी बेळगांवच्या दिव्यांग थ्रोबाॕल खेळाडूंना घडवताना आलेले आपले अनुभव सांगितले.
यासमयी श्री लखमसीभाई लद्दड,
श्री धरमसीभाई भानूशाली (भद्रा),
श्री भूपेंद्रभाई पटेल, अध्यक्ष श्री रमेशभाई लद्दड, उपाध्यक्ष श्री बिपीनचंद्र पटेल, सचीव श्री विजय डी भद्रा, कोषाध्यक्ष श्री पंकजभाई शहा, श्री महेंद्रभाई पटेल, श्री चेतन शहा, श्री भावेश चुडासमा आणि श्री रितेशभाई पटेल ही गुजराती समाजाची जेष्ठ मान्यवर मंडळी उपस्थित होती.
कार्यक्रमानंतर सर्वांनी भोजनाचा आनंद घेतला.