This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

संत मीरा शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ.

संत मीरा शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ.
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संत मीरा शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ.

 

बेळगाव ता,28. अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ पार पडला सन 2022-23 सालाचा आदर्श विद्यार्थी पृथ्वीराज शिंदे, आदर्श विद्यार्थिनी सानिका माळवी, तर शाळेचा सर्वोत्तम क्रीडापटू अथर्व देमजी, वैभव मरगाळे, मुलींच्यात स्वारा आंजणकर साई बसरीकट्टी यांना देण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एलआयसीचे निवृत्त विभागीय व्यवस्थापक डॉ, अरविंद कुलकर्णी, राणी चन्नम्मानगर येथील एस बी कॉलेजच्या निवृत्त प्राचार्य पद्मा कुलकर्णी, संत मीरा शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे ,प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव व्यासपीठावर उपस्थित होत्या .प्रारंभी पाहुण्यांचे हस्ते ओंकार, सरस्वती भारत माता फोटोपूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले,

पाहुण्याचा परिचय ऋषीका हनगंडी हिने केला पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत अध्यक्ष परमेश्वर हेगडे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी यांनी केले यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांनी दीप प्रज्वलन केले पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर विद्यार्थी स्वाती तोळणकर, भूमिका कुलकर्णी, सानिका माळवी, पृथ्वीराज शिंदे, यांनी आपले शाळेबद्दलचे मनोगत व्यक्त केले ,याप्रसंगी गीता वर्पे, आशा कुलकर्णी ,सुजाता पाटील ,रूपाली जोशी, श्रद्धा मेंडके, धनश्री सावंत, प्रेमा मेलीणमनी,सविता पाटणकर रूपा पाटील क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील, मयुरी पिंगट व शिक्षक वर्ग उपस्थित होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिंचना कुर्डेकर व प्रभा चौगुले तर श्रद्धा माने हिने आभार मानले.

 


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24