*चलवेनहट्टी येथे भातरोप लावणी जोरात*
वरूण राज्याने उशिरा का होईना पण दमदार सुरुवात केल्यानंतर चलवेनहट्टी अगसगे हंदिगनूर म्हाळेनट्टी या भागात भातरोप लागवडीसाठी बळीराजाची लगबग सुरू आहे रोपासाठी भात पेरणी केली होती त्यावेळी पाऊस खूप कमी प्रमाणात झाला होता शेतकऱ्यांनी विहिरीचे पाणी देऊन रोपेचे भात वाढविले होते.
त्यामुळे भातरोप लावणीचे काम हे सर्वस्व पावसावर अवलंबून असल्याने पावसाने उशिरा सुरुवात केल्यानंतरही रोप लावण्याचे काम योग्य वेळेत होत आहे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे तरी सर्वच शेतकरी रोप लावण्यासाठी चढाओढ करत असल्याने शेतकऱ्यांना मजुर मिळणे कठीण झालं आहे दरवर्षी आषाढी एकादशी पूर्वी भातरोप लागवड होत होती या वर्षी अधिक महिना असल्याने योग्य वेळेत भातरोप लावणी होत असल्याने आणी रोप लावणीसाठी समाधानकारक पाऊस पडत असल्याने बळीराजाची धांदल वाढली आहे.