बेळगाव : प्रियकर व त्याच्या मित्रांच्या मदतीने पत्नीने पतीचा काटा काढला आणि स्वतःच पती बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्थानकात नोंदवली असल्याची घटना उघडकीस आली आहे.तर या प्रकरणी पोलिसांनी पत्नीसह तिघांना अटक केली आहे.
आपले चालू असलेले अनैतिक संबंध पतीला समजल्यामुळे प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीचा काटा काढला व त्याचा मृतदेह चोर्ला घाटात फेकून दिला अशी कबुली चौकशी दरम्यान पत्नीने पोलिसांना दिली आहे.
स्वतःच्या पतीला मारणाऱ्या आरोपी महिलेचे नाव संध्या कांबळे असे आहेत सध्या तिचे प्रियकर बाळू बिरंजे व त्याचे दोन साथीदार अशा चौघा जणांना एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे.
तीन महिन्यापूर्वी आपला पती बेपत्ता असल्याची तक्रार एपीएमसी पोलीस ठाण्यात केली होती. पोलिसांच्या तपासाच्या दरम्यान संशयावरून पोलिसांनी आरोपी संधीची चौकशी केली असता. तिने आपण आपल्या पतीचा प्रियकर व त्याच्या मित्रांच्या सहाय्याने खून केला असल्याचे तिने कबूल केले आहे.
प्रियकर बाळू सोबत त्याच्या मित्रांच्या सहाय्याने पतीला झोपेच्या गोळ्या देऊन त्याचा गळा दाबून गोव्यातील चोर्ला घाटात त्याचा मृतदेह टाकल्या असल्याची कबुली आरोपी पत्नीने दिली आहे . एपीएमसी पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींना अटक केली असून रमेश च्या मृतदेहाचा शोध चालू आहे.