खादरवाडी गावातील शेतकऱ्यांनी घेतली मंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट
बेळगाव :खादरवाडी मधील गावरान जमीन भडकवण्यासंदर्भात ग्रामस्थांनी घेतली नगर विकास मंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन जमिनी संदर्भात माहिती दिली.
खादरवाडी येथील ग्रामस्थांची जमीन 7/12 उतारावर नोदणी नसलेली जमीन काही राजकीय नेते कवडी मोलाच्या भावात जागा बळकाऊ पाहत आहेत . ती जमीन गावकऱ्यांनाच मिळावी यासाठी नगर विकास मंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन गावकऱ्यांनी आपली समस्या मांडली.
बुडाणे गावकऱ्यांना या जमिनीसंदर्भात नोटीसी बजावली आहे. व येथील जमीन विकण्यात आली आहे. यासंदर्भात झालेल्या भ्रष्टाचारची सखोल चौकशी व्हावी.अशी मागणी जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या निवेदनाद्वारे मंत्री सतीश जारकीहोळी यांना यावेळी केली.