‘लव्ह जिहाद’ला तोंड देण्यासाठी धर्मशिक्षण घेणे, तसेच स्वरक्षण शिकणेही आवश्यक ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती
निपाणी (कर्नाटक) – ‘लव्ह जिहाद’ आता देहली येथे नसून तो आपल्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोचला आहे. ‘लव्ह जिहाद’ला तोंड देण्यासाठी धर्मशिक्षण घेणे, तसेच स्वरक्षण शिकणेही आवश्यक आहे. हिंदू युवती आणि महिला यांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता हिंदु संस्कृतीप्रमाणे आचरण करणे आवश्यक आहे. धर्माचरण केल्यास ‘लव्ह जिहाद’ला हिंदू युवती बळी पडणार नाहीत,
असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी केले. विश्व हिंदु परिषद-बजरंग दल यांच्या वतीने सौंदलगा येथे ३ जून या दिवशी ग्रामपंचायत सभागृह येथष ‘लव्ह जिहाद’आणि ‘लँड जिहाद’विषयी मार्गदर्शन करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते.
याचा लाभ निपाणी, यमगर्णी, सौंदलगा परिसरातील १३० हून अधिक जिज्ञासूंनी घेतला. या वेळी श्री. सागर हंकारे, बजरंग दलाचेे श्री. अजित पारळे, जिल्हा सहसंयोजक श्री. राजू पुरंत, सर्वश्री बबन निर्मले, अजय शेवाळे, ऋषिकेश पाटील, सचिन अडसूळ, रामदास सूर्यवंशी, सचिन पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परिश्रम भानसे, तालुका कार्यवाह सुमेध देशपांडे रोहित पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ऋषिकेश पाटील तर आभार श्री. सचिन अडसूळ यांनी मानले.