*चलवेनहट्टी येथे निवृत्त सैनिकाचा सत्कार*
चलवेनहट्टी येथे आजी माजी सैनिक संघटना यांच्या वतीने निवृत्त जवान सुभेदार मेजर जोतिबा मारुती पाटील यांचा सत्कार करण्यात आले यावेळी निवृत्त जवानाचे गावात आगमन होताच गावात जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावातील विविध संघटनेकडून त्यांचे स्वागत करण्यात आलं मिरवणूक संपूर्ण गावात फिरवण्यात आली यावेळी आज माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी सदस्य ग्रामस्थ युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जोतिबा पाटील तसेच त्यांच्या पत्नी यांचा सत्कार करण्यात आला आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष ऑर्डीनरी कॅप्टन कृष्णा पाटील यांच्या हस्ते शाल पुष्पहार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तत्पूर्वी या सत्कार सोहळ्याला प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनी ईस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तर स्वागत गीत म्हणून उपस्थिताचे स्वागत केले.
छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे पूजन निवृत्त जवान यांच्या हस्ते तसेच दीप प्रज्वलन व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते तसेच संघटनेचे अध्यक्ष तसेच सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले संतराम आलगोंडी यांनी प्रास्ताविक करताना हा सत्कार सोहळा आयोजित करण्याचा हेतू व उद्देश सांगत आपले मनोगत व्यक्त केले यानंतर ब्रम्हलिंग देवस्थान जिर्णोद्धार कमिटी, तसेच मस्नागाई सौहार्द सोसायटी, ग्रामपंचायत सदस्य,तसेच मित्र मंडळी यांच्याकडून निवृत्त जवान तसेच त्यांच्या पत्नीचा सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्य यल्लाप्पा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सैनिकाचे भरभरून कौतुक केले तसेच खरोखरच हा सत्कार सोहळा कौतुकास पात्र असतो आणि अशा सत्कारामुळे आपला ऊर अभिमानाने भरून यावे यासाठी युवकांनी जास्तीत जास्त सैनिक सेवेत सहभागी व्हावे असे सांगितले तर जोतिबा पाटील यांनी सैनिक सेवेत कार्यरत असताना आपण तिथल्या परिस्थितीशी वातावरणाशी जुळवून घेत कशी सेवा करावी लागते आणी आपण देशासाठी काहीतरी करतोय याचा सार्थ अभिमान आपणास असतो आणि अशा सत्कारामुळे ते सर्व कार्य सत्कर्मी लागतं आणि पुन्हा देशासाठी लढण्याची जिद्द मनामध्ये निर्माण होते आणी अभिमानाने उर भरून येतो १९९२ साली आपण सैनिकात भरती झालो आणी एकत्तीस वर्ष सेवा करुण २०२३ साली आपण निवृत्त झालो असा क्षण खरोखरच भाग्यवंतांना लाभतो असे सांगितले.
यावेळी त्यांनी सैनिक संघटनेला आकारा हजार एकशे आकारा रुपयेची देणगी दिली तर अध्यक्षीय भाषणात कृष्णा पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना इथून पुढे नव्याने भरती झालेल्या सैनिकाचे अभिनंदन तसेच निवृत्त झालेल्या जवानाचे सत्कार सोहळा आयोजित करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य आपल्या संघटनेच्या वतीने करण्यात येईल असे सांगितले. यावेळी सूत्रसंचालन मनोहर हुंदरे यांनी केले तर आभार प्रदर्शन भरमा पाटील, यांनी केले यावेळी निंगाप्पा हुंदरे,अर्जुन बडवानाचे,परशराम पाटील, परशराम बडवानाचे,नारायण हुंदरे,दीपक हुंदरे,मोहन हुंदरे, सुनील पाटील,सातेरी पाटील, मल्लाप्पा हुंदरे,मारुती पाटील, विनोद पाटील, गुरुनाथ पाटील, महादेव सनदी,जोतिबा बडवाणाचे मनोहर राजाई, निंगानी भरमा हुंदरे, बाबु पाटील,रेखा पाटील,रेणुका सनदी नंदा हुंदरे आदी उपस्थित होते.