हाजयात्रेकरूंसाठी लसीकरण शिबिराचे आयोजन
हजयात्रे करिता बेळगाव मधून जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी आज लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य खाते आणि अंजुमन ए इस्लाम या संस्थांच्या वतीने आज अंजुमन सभागृहात हे शिबिर पार पडले.
यावेळी बोलताना माजी आमदार फिरोज शेठ म्हणाले की दरवर्षी केंद्रीय हज कमिटीद्वारे विविध राज्यातून लाखो लोकांना निवडून हा यात्रेला पाठविले जाते. त्यामुळे या सर्वांचे लसीकरण होणे गरजेचे आहे.तसेच यात्रेसाठी जाणाऱ्या नागरिकांचे लसीकरण सक्तीचे आहे
त्यामुळे आज जिल्हा आरोग्य खात्याच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सुमारे 400 हून अधिक यात्रेकरूंची आरोग्य तपासणी करून त्यांना लस दिली. यावेळी शेकडो मुस्लिम बांधव अंजुमन संस्थेचे सचिव व नगरसेवक समीउल्ला माडीवाले बाबुलाल मुजावर गफूर घेवाले यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते