*सौ स्नेहा जोशी व श्री प्रदीप जोशी कुटुंबीयांचा सुत्य उपक्रम…….*
श्री व सौ जोशी कुटुंबीयांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शांताई वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील वृद्धाच्या सोबत वाढदिवस साजरा केला वृद्धांची विचारपूस केली आणि नेहा जोशी यांनी रुपये पंचवीस हजार चा धनादेश शांताई वृद्धाश्रमाचे आज्जी श्रीमती रजनी ताई देशपांडे यांच्याकडे सुपूर्द करून आगळावेगळा प्रकारे लग्नाचा वाढदिवस साजरा करून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे
याबद्दल श्री मोरे यांनी श्री व सौ जोशी कुटुंबीयांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या श्री प्रदीप जोशी यांनी वृद्धाश्रमाच्या कार्याबद्दल बोलताना वृद्धाश्रम हे वृद्धांचे दुसरे बालपण आहे वृद्धाश्रमाचा कार्याबद्दल समाधान व्यक्त केले तेथे घेतली जाणारी वृद्धांची काळजी वैद्यकीय सेवा, योग अभ्यास, खानपान हे सारेच येथील संचालक मंडळांनी कार्य खूपच छान आहे सौ नेहा जोशी यांनी वृद्धांची संवाद साधला वृद्धांच्या बरोबर अल्पहार करून आनंद घेतला, वृद्धाच्या उदंड आरोग्यासाठी सदिच्छा व्यक्त केला त्यांच्यासोबत सौ नेहा जोशी यांच्या मातोश्री व कन्या रसिका हेही उपस्थित होते शेवटी आश्रमच्या वतीने देणगी दिल्याबद्दल जोशी कुटुंबीय यांचे कार्याध्यक्ष विजय मोरे यांनी आभार व्यक्त केले