गायन स्पर्धेची आज अंतिम फेरी
बेळगाव : टिळकवाडी येथील ठळकवाडी शाळेच्या जनार्दन आजगावकर सभागृहामध्ये अस्मिता क्रिएशन पुरस्कृत पहिल्या जिल्हास्तरीय गायन स्पर्धेतील अंतिम फेरी शुक्रवार ता. २१ रोजी सकाळी ११.०० प्रारंभ वाजता होणार आहे. स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून मिनाताई बेनके, कॅप्टन गिरीश, केशव रेवणकर, राजू पवार, मारुती कोनो ठळकवाडी शाळेचे मुख्याध्यापक राजू कुडतूरकर आदी उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेत १५० हून अधिक गायकांनी सहभागी झाले आहेत. यात यजमान बेळगाव, निपाणी, खानापूर, संकेश्वर, भागातून स्पर्धकांनी भाग घेतला आहे. या स्पर्धेत पंच म्हणून चंद्रज्योती देसाई, संतोष सुतार, रूपा वस्त्रद हे उपस्थित राहणार आहेत.