हॉकी बेळगाव-यश इव्हेंटस पुरस्कृत
हॉकी प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ
बेळगाव / प्रतिनिधी हॉकी खेळाची क्रेझ आणि उत्साह बेळगावने जागतिक स्तरावर नेऊन ठेवला आहे असून हॉकीसाठी असलेली ही ख्याती पुन्हा मिळविण्यासाठी आणि तरुणांनी केवळ हॉकी खेळण्यासाठीच नव्हे तर शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त होण्यासाठी युवक युवतींना पुढे यावे असे आवाहन उद्यमबाग पोलीस निरीक्षक आर एस बिरादार यांनी केले. ते हॉकी बेळगाव आयोजित मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिर उद्घाटन प्रसंगात बोलत होते.
अध्यक्षस्थानी घुळाप्पा होसमनी होते. प्रारंभी प्रकाश कालकुंद्रीकर यांनी शिबिराचे प्रास्ताविक व माहिती सांगितली. सचीव सुधाकर चाळके यांनी प्रशिक्षणार्थीना खास मार्गदर्शन केले.
माजी हवाईदल अधिकारी देवीकांत बिर्जे यांनी प्रशिक्षणार्थीना व्यायाम व खेळांचे महत्व पटवून दिले. बीडीएचए अध्यक्ष धनंजय पटेल यांनी बेळगांवमधील हाॅकीपटूंची माहिती सांगितली. घुळाप्पा होसमनी यांनी प्रशिक्षणार्थीना हॉकी प्रशिक्षण शिबिरासाठी १० हजार रुपयांची बक्षिसे जाहीर केली.
हॉकी प्रशिक्षण शिबिरात सुमारे २५ जणांनी सहभाग घेतला आहे. आणखी ज्यांना सहभाग घ्यावयाचा आहे त्यांनी लेले मैदानावर संपर्क साधावा. हॉकी प्रशिक्षण शिबिर यश इव्हेंटसचे संचालक अजिंक्य कालकुंद्रीकर यांनी पुरस्कृत केले आहे.
यावेळी साई श्रध्दा महिला कल्याण संस्थेच्या अध्यक्षा सविता हेब्बार, आशा होसमनी, श्रीकांत आजगांवकर, मनोहर पाटील, उत्तम शिंदे, संजय शिंदे, गोपाळ खांडे, नामदेव सावंत, बाजीराव शिंदे, बसवराज बडची, प्रशांत मंकाळे, विनोद पाटील, धारू चाळके, संतोष दरेकर, अवधूत तुडवेकर आदी उपस्थित होते.
हॉकी प्रशिक्षण शिबिर सुभाषचंद्र बोस (लेले मैदान) टिळकवाडी येथे रविवार वगळता १५ एप्रिल ते १९ मे २०२३ पर्यंत दररोज सकाळी ६.३० ते ८.३० आणि संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत हे प्रशिक्षण शिबिर होणार आहे.