शोभा सोमनाचे महापौर तर रेश्मा पाटील यांची उपमहापौर पदी निवड
संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेल्या महापौर व उपमहापौर पदी आता शोभा सोमनाचे आणि रेश्मा पाटील यांची वर्णी लागली आहे. गेल्या चार वर्षांपासून महानगरपालिकेतील महापौर व उपमहापौर पद रिक्त होते तर आता चार वर्षानंतर या पदी मराठी माणसाचीच वर्णी लागली आहे.
सप्टेंबर 2021 साली महानगरपालिकेची निवडणूक झाली होती. तर आता तब्बल 16 ते 17 महिन्यानंतर महापौर आणि पदाकरिता निवड झाली आणि यामध्ये अगोळतील नगरसेविका शोभा सोमनाचे आणि शाहूनगर च्या नगरसेविका रेश्मा पाटील यांनी बाजी मारली आहे
आज निवडणूक होताच महानगरपालिकेसमोर जल्लोष झालेला पाहायला मिळाला. यावेळी महापौर आणि उपमहापौर यांच्यावर गुलालाची उधळण करण्यात आली.