शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीच्या मार्गात होणार बद्दल..
रविवारी सकाळी दहा वाजता जतीमठ येथे झालेल्या शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्या बैठकीत यावर्षीपासून मार्गात बदल करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले. दरवर्षी बेळगावातील शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो.
शिवभक्तांची गर्दी देखावे पाहण्यासाठी प्रचंड प्रमाणात असते त्याचबरोबर झांज पथक आणि डॉल्बी यांच्या आवाजात देखावे सादर करताना व्यत्यय येतो. हे टाळण्यासाठी शिवजयंती चित्ररथ मार्ग बदलण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. चन्नमा चौकातील गणेश मंदिर पासून चित्ररथाची सुरुवात करून छत्रपती धर्मवीर संभाजी चौक मार्गे टिळक चौक ते शिवाजी उद्यान येथे सांगता करण्याचे ठरविण्यात आले. त्याचबरोबर अनेक बाबीच्या बाबत साधक बाधक चर्चा झाली.
नवीन कार्यकारणी ठरविण्यात आली यानंतर जर निवडणूकीच्या आचारसंहितेचा शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीवर काही परिणाम होत असेल तर सर्वानमते 20 मे 2023 ही तारीख निश्चित करावे असे ठरविण्यात आले.शिवजयंती चित्ररथ मिरवणूक पुढे छत्रपतिचा भव्य दिव्य लवाजमाचा देखावा करावा अशी सूचना गुणवंत पाटील यांनी केले बैठकीला उपस्थितीत सल्लागार नियंत्रण प्रमुख गुणवंत पाटील शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव कार्याध्यक्ष प्रसाद मोरे सरचिटणीस जे बी शहापूरकर उपाध्यक्ष मेघन लंगरकांडे विनायकराव बावडेकर राहुल जाधव सुरज मंडोळकर प्रमोद कुंडेकर ओमकार केरवाडकर विशाल पेडणेकर दादू पेडणेकर संतोष कणेरी श्रीधर देसाई देवदत्त शिंदोळकर रोहित मोरे प्रवीण खेडेकर प्रवीण बाळेकुंद्री प्रसाद हलगेकर सुशांत जाधव संदीप संकट ओमकार पुजारी आकाश हांडे यासह अन्य शिवभक्त उपस्थित होते.