विद्याभारती अखिल भारतीय सर्वसाधारण सभेला आजपासून प्रारंभ.
बेळगाव ता 7.बेंगलोर चन्नेनहळ्ळी येथील जनसेवा विद्याकेंद्र शाळेच्या विद्याअरण्य सभागृहात विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्थानच्या तीन दिवशीय सर्वसाधारण सभेला प्रारंभ झाला. विविध राज्यातून 350 हून अधिक पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत.
तीन दिवसीय सर्वसाधारण सभेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ, कृष्णगोपाल,
म्हैसूर चाणक्य विद्यापीठाचे कुलगुरू व एनईपी कमिटीचे सदस्य एम के श्रीधर, अखिल भारतीय विद्याभारती अध्यक्ष दुसी रामकृष्णराव, अखिल भारतीय विद्याभारती महामंत्री अवनीश भटनागर, अखिल भारतीय संघटन मंत्री गोविंद महांतो उपस्थित होते प्रारंभी पाहुण्यांचे हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती, ओमकार,भारतमाता फोटो पूजन करून या तीन दिवसीय सर्वसाधारण बैठकीचे उद्घाटन करण्यात आले, प्रारंभी विद्याभारती महामंत्री अवनीश भटनागर यांनी उपस्थित पाहुण्यांचा परिचय व विविध मान्यवरांचे स्वागत केले डी रामकृष्णराव व कर्नाटक राज्य प्रांत विद्याभारती अध्यक्ष परमेश्वर हेगडे यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले
या बैठकीत आगामी तीन दिवसीय 2023-24 सालाची विद्याभारती निती ,सामाजिक, चिंतन ,मंथन, विचारविनिमय समय निर्णय ,घेण्यासाठी आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीत खास करून अखिल भारतीय यांच्यावतीने 2022- 23 सालामध्ये घेण्यात आलेल्या अखिल भारतीय खेल, अखिल भारतीय गणित विज्ञान, सांस्कृतिक महोत्सव, शैक्षणिक गुणवत्ता, विज्ञानाचे कार्यक्रम, वेदगणित, बालिका शिक्षा अभ्यासवर्ग, शिशु वाटिका आचार्य प्रशिक्षण वर्ग, विद्याभारती उच्च शिक्षण संस्थांची अखिल भारतीय गोष्टी, विद्याभारती शाळा राष्ट्रीय शिक्षामिती 2020 च्या क्रियावाचन कार्यविभाग के विविध कार्यक्रम याचा आढावा घेत पुढील वर्षी होणाऱ्या पंचशील विद्याभारती शिक्षण प्रणालीबद्दल चर्चा करण्यात येणार आहे, या चर्चेसाठी विविध राज्यातून विद्याभारती राज्याध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव उपस्थित आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किसन जी यांनी तर डॉ, मधुश्री सावजी यांनी आभार मानले.