पूर्वीप्रमाणे सहा टक्के आरक्षणामध्ये समावेश करून घ्या
अखिल कर्नाटक कक्कया हिंदूढोर समाज महिला मंडळ, आणि समस्त कर्नाटक कक्कया हिंदीतून समाज यांच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात ढोर समाजाच्या महिलांनी आपले मुलांचे भवितव्य धोक्यात आले आहे ढोर समाजाला पूर्वी दिलेले सहा टक्के आरक्षण आता एक टक्क्यावर आल्याने तो पूर्वीप्रमाणे सहा टक्के आरक्षणामध्ये समावेश करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
ढोर समाजाचा प्रामुख्य व्यवसाय हा चामड्याची उत्पादने तयार करण्याचा आहे. तसेच आजच्या आधुनिक जीवनशैलीमध्ये ढोर समाजाला जुळवून घेणे कठीण बनले आहे शेती आणि इतर व्यवसाय या कोणत्याही मदतीशिवाय आणि सहकार्य शिवाय ढोर समाज प्रगती करत आहे तसेच कच्चामाल ही मिळणे त्यांना कठीण झाले आहे.
त्यामुळे ही सर्व समस्या असतानाच पूर्वी 1956 मध्ये घटनेत जी ढोर समाजाकरिता तरतूद करण्यात आली ती तशीच ठेवावी आणि प्रवर्ग एकच्या सहा टक्के आरक्षणामध्ये समावेश करावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.
याप्रसंगी मंडळ अध्यक्ष अश्विनी श्रेयाकर, उपाध्यक्ष रेणुका हूतुगि, स्नेहा कदम ,महादेव पोल ,विठ्ठल पोलो, प्रताप श्रेयाकर ,विवेक श्रेयाकर, विनायक कदम, नंदू श्रेयाकर, किशोर श्रेयाकर, डॉ बी.बी. मुन्नोळी, उपस्थित होते.