दररोज दोन हजारहून अधिक वाहनांची तपासणी
कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर असणाऱ्या कोगनोळी चेक पोस्टवर दररोज दोन हजारहून अधिक वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसात कोगनोळी चेक पोस्टवर तैनात असणाऱ्या पथकाने बेहिशोबी रोख रक्कम आणि अन्य साहित्य मोठ्या प्रमाणावर जप्त केले आहे.दररोज तीन पाळ्यामध्ये येथे तपासणीचे काम सुरू आहे.
महसूल,पोलीस आणि ग्राम पंचायतीचे कर्मचारी दिवस रात्र येथे सेवा बजावत आहेत.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात रोख रक्कम तसेच मतदारांना वाटण्यासाठी साहित्य आणण्यात येण्याची शक्यता गृहीत धरून महाराष्ट्राला लागून असलेल्या बेळगाव जिल्ह्याच्या सीमेवर तपासणी नाके उभारण्यात आले आहेत.तेथे सी सी टी व्हि देखील बसवण्यात आले आहेत.