मुतगा येथे रविवारी कुस्ती मैदान
मुतगा येथे हनुमान यात्रेनिमित्त रविवार दि. 2 एप्रिल रोजी कुस्ती मैदान आयोजित करण्यात आले आहे.
मुतगा- मुचंडी संपर्क रस्त्याजवळील दमनी तलावात आखाडा निर्माण करण्यात आला आहे. हनुमान जयंतीनिमित्य गावात अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने पहिल्या क्रमांकाची कुस्ती सायंकाळी 6.30 वा लावण्यात येणार आहे. 1 ते 8 नंबरपर्यंतच्या कुस्त्या जोडण्यात आल्या असून त्यानंतर खळ्याच्या कुस्त्या होणार आहेत.
मैदानात दु 2 ते 3 यावेळेत जोड पाहून कुस्त्या ठरविण्यात येणार आहेत. कुस्त्यांना प्रारंभ झाल्यानंतर कुस्त्या जोडण्यात येणार नाहीत असा निर्णय कमिटीने घेतला आहे. त्यामुळे इच्छुक मल्ल्यानी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
मैदानातील अव्वल कुस्ती चालू वर्षीचा महाराष्ट्र केसरी पै. शिवराज राक्षे आणि पंजाबच्या भारतकुमार गोलू आखाड्याचा मल्ल सुपिंदर यांच्यात होणार आहे. दोन नंबरची लढत डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे आणि हरियाणाचा राष्ट्रीय विजेता मल्ल विक्रांतकुमार यांच्यात होणार आहे.
तिसऱ्या क्रमांकाची लढत कर्नाटक केसरी पै. संगमेश बिरादार विरुद्ध युवा महाराष्ट्र केसरी बाळू बोडके, चौथी कुस्ती पै.कीर्तिकुमार (कार्वे) वि पै. विश्वजित रुपनर (कराड), पाचवी कुस्ती पै. अमोल नरळे( सांगली) वि पै.विक्रम (शिनोळी), सहावी कुस्ती पै.किरण अष्टगी वि. गुत्ताप्पा (दावणगेरी), सातवी पै. प्रेम (कंग्राळी खु ), वि. नवनाथ राक्षे(पुणे), आठवी कुस्ती कुस्ती पै.पवन चिकदिनकोप वि.संकल्प (कंग्राळी) यांच्यात होणार आहे.