कॅम्प भागात पाण्याची मोठी समस्या: त्वरित पाणीपुरवठा करा
शहरात पाण्याची समस्या सर्वच नागरिकांना सतावत आहे त्यातच शहरातील कॅन्टोन्मेंट भागात दोन आठवड्यांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा झाला नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
त्यामुळे आपल्याला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत व्हावा या मागणी करिता त्यांनी आज थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आणि जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या भागात पिण्याचे पानाचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली.
शहरातील अनेक भागात 24 तास पाणीपुरवठा होत आहे मात्र ज्या भागात 24 तास पाणीपुरवठा नाही अशा नागरिकांना पाण्याकरिता इतरत्र भटकावे लागत आहे. तसेच आता 14 दिवस नळाला पाणी येत नसल्याने नागरिक हैरान झाले आहेत.
त्यामुळे आपल्याला पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन त्यांनी आज जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना दिले. यावेळी त्यांनी पाणी पुरवठ्याच्या बाबत एलएनटी कंपनीचे अधिकारी सहकार्याने वागत नाहीत आपल्याला उद्धटपणे बोलतात असा आरोप केला.
यावेळी कॅन्टोन्मेंटचे माजी उपाध्यक्ष साजिद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात कॅन्टोन्मेंट भागातील नागरिकांनी आपल्या भागात पिण्याच्या पाण्याची सोय सुरळीत करावी अशी मागणी केली यावेळी त्यांच्यासोबत कॅन्टोन्मेंट भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.