This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*बेळगावात 5 नोव्हेंबरचा कॅन्डलमार्च स्थगित*

*बेळगावात 5 नोव्हेंबरचा कॅन्डलमार्च स्थगित*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगावात 5 नोव्हेंबरचा कॅन्डलमार्च स्थगित

बेळगाव- महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे – पाटील यांनी उभे केलेले आंदोलन काही काळासाठी स्थगित करण्यात आलेले आहे . त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून बेळगाव येथे कॅन्डलमार्च घेण्यात येणार होता परंतु महाराष्ट्रातील मराठा आंदोलनाची दिशा 24 डिसेंबर नंतर ठरणार असल्यामुळे हा कॅन्डलमार्च काही काळ स्थगित ठेवून महाराष्ट्राच्या आंदोलना बरोबर पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे .

रविवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी कॅन्डलमार्च काढण्यात येणार होता . त्यासंबंधी आज रंगुबाई पॅलेस येथे बैठक घेण्यात आली .यावेळी बोलताना प्रकाश मरगाळे म्हणाले ,हे आंदोलन अतिशय समंजसपणे आणि निश्चित दिशेने चाललेले आहे त्यामुळे महाराष्ट्रात ज्याप्रमाणे दिशा ठरवण्यात येईल त्याप्रमाणे बेळगावतही आंदोलन घेण्यात येईल त्याचबरोबर सीमा भागातील मराठी माणूस आणि त्याच्या समस्या याबाबत राष्ट्रपती , राज्यपाल , पंतप्रधान व गृहमंत्र्यांना पत्र पाठवण्यात येणार आहे .

बिदरहून आलेल्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीकडे दिलेल्या पत्राची ही दखल घेण्यात आली.  बैठकीत उपस्थित असलेल्या सभासदांनी आपली मते मांडली त्यात सीमाभागात जनजागृती करण्याचे ठरवण्यात आले .

याप्रसंगी गुणवंत पाटील नेताजी जाधव , शिवराज पाटील, संजय मोरे , सीमाकवी रवी पाटील ,गणेश दड्डीकर , गोपाळ चौगुले व सतिश पाटील यासहआदी उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24