बेळगांव:जुलै महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत महापालिकेची कागदपत्रे इतर भाषेसह मराठी भाषेतूनही देण्याचा ठराव संमत केला होता. मात्र हा ठराव जाणून बुजून पायदळी तुडवल्याचे दिसून येत आहे.मराठी नगरसेवकांच्या घराच्या भिंतीवर कन्नडमध्ये कागद पत्रे चिकटविण्यात आली आहेत.त्यामुळे संताप व्यक्त होत आहे .
महिनाभरातच महापालिका प्रशासनाने मराठीच्या ठरावाला केराची टोपली दाखवली आहे. फक्त कन्नड आणि इंग्रजीमध्ये नोटीस बजावल्यामुळे म. ए. समितीच्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेची नोटीस स्वीकारली नाही. त्यामुळे अखेर महापालिकेने नगरसेवकांच्या घरांवर सभेची नोटीस चिकटवून आडमुठेपणा दाखवला आहेत्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे .
ठराव मंजूर होऊन देखील असा आडमूठ पणा करत असल्याचे स्पष्ट झाले असून मराठी माणसावर दडपशाही अजूनही सुरु असल्याचे स्पष्ट झाले आहे .
१६ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेची नोटीस फक्त कन्नड आणि इंग्रजीमध्ये काढली असून मराठी नोटिसीला बगल देण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांनी नोटीस स्वीकारण्यास नकार दिला.