प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी 15 सप्टेंबर 2023 पर्यंत नामांकन अर्ज सादर करता येणार
नवी दिल्ली 13 : प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी नामांकन अर्ज सादर 15 संप्टेंबर 2023 पर्यंत सादर करण्याचे आवाहन महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून करण्यात आले आहे, या पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याची तारीख 31 ऑगस्ट 2023 पर्यंत होती, आता ती वाढवून 15 सप्टेंबर 2023 पर्यंत करण्यात आलेली आहे.
महिला आणि बाल विकास मंत्रालय दरवर्षी आपल्या मुलांची ऊर्जा, दृढनिर्धार , क्षमता, उमेद आणि उत्साहाचा गौरव करण्यासाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराचे (पीएमआरबीपी ) आयोजन करत असते.
या पुरस्कारासाठी 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेले तसेच भारताचे नागरिकत्व आणि रहिवासी असलेले मुले, मुली या पुरस्कारासाठी अर्ज करु शकतात किंवा कोणीही भारतीय नागरिक देखील पुरस्कारासाठी पात्र असणा-या मुला-मुलींचे नामांकन करु शकतात. प्राप्त अर्जांची छाननी प्रथम स्क्रिनिंग समितीव्दारे केली जाते आणि अंतिम निवड राष्ट्रीय निवड समितीव्दारे केली जाते. 26 डिसेंबर रोजी वीर बाल दिवस या दिवशी पुरस्कार जाहीर केले जातील. भारताचे राष्ट्रपती यांच्याकडून नवी दिल्ली येथे दरवर्षी जानेवारी महिन्यात होणा-या विशेष संमारंभात विजेत्यांना पुरस्कार प्रदान केले जातात. पुरस्काराचे स्वरुप पदक, रोख एक लाख रुपये बक्षीस, प्रमाणपत्र व प्रशस्तीपत्र असे आहे.
अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेची संपूर्ण माहिती पुढील वेबसाईटवर देण्यात आली आहे तसेच पुरस्कारांसाठीचे अर्ज https://awards.gov.in या संकेतस्थाळाच्या माध्यमातूनच स्वीकारण्यात येणार आहे.