Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Crime News

*उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्तेचा संशय; लोकायुक्तांचा वन विभागाच्या ACF किरण अंगडी यांच्यावर छापा*


शिवमोग्गा : उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता जमा केल्याच्या आरोपांप्रकरणी कर्नाटक लोकायुक्त पथकाने बुधवारी वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक (ACF) किरण अंगडी यांच्याशी संबंधित विविध ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केली. या कारवाईत शिवमोग्गा येथील कार्यालयासह इतर ठिकाणांवरील कागदपत्रांची सखोल तपासणी करण्यात आली.

लोकायुक्त अधिकाऱ्यांनी सकाळी शिवमोग्ग्यातील आल्कोळ परिसरातील वन विभागाच्या संशोधन व विकास विभागाच्या शंकर रेंज कार्यालयात भेट देत किरण अंगडी यांच्या कार्यालयातील महत्त्वाच्या फाईल्स, कागदपत्रे आणि इतर नोंदींची पडताळणी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, किरण अंगडी यांची सुमारे वर्षभरापूर्वी धारवाड येथून पदोन्नतीनंतर शिवमोग्गा येथे बदली झाली होती. त्यांच्या विरोधात उत्पन्नाच्या तुलनेत अधिक मालमत्ता जमा केल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर लोकायुक्तांनी ही चौकशी सुरू केली आहे.

शिवमोग्ग्यासह धारवाड आणि त्यांनी यापूर्वी सेवा बजावलेल्या इतर ठिकाणांवरही एकाच वेळी छापे टाकण्यात आले. निवासस्थान, कार्यालय तसेच संबंधित ठिकाणी मालमत्तेची कागदपत्रे, आर्थिक व्यवहारांची नोंद आणि इतर महत्त्वाचे दस्तऐवज तपासण्यात येत आहेत.

लोकायुक्तांची कारवाई अद्याप सुरू असून तपास पूर्ण झाल्यानंतर जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांबाबत आणि पुढील तपासाबाबत अधिकृत माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या कारवाईमुळे वन विभागात मोठी चर्चा रंगली आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*अनाथ मुलांना चांदीच्या वस्तू देऊन  मामाची भूमिका निभावणारे समाजसेवक आकाश हलगेकर* ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थीनींचा दैदिप्यमान विजय; आंतरशालेय स्पर्धेत प्रथम क्रमांकावर मोहोर !डॉ. दीपक पवार यांची महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या पदाधिकाऱ्यांशी सीमाप्रश्नावर सविस्तर चर्चा*चन्नेवाडी गावकऱ्यांच्या स्वतंत्र बूथ मागणीला यश**आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूलचा दमदार विजय; तालुका पातळीसाठी निवड**सीमाप्रश्नी पुणे विभाग समितीकडून घरोघरी जनजागृती अभियान महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग व पुणे विभाग समितीची संयुक्त बैठक**भारत विकास परिषदेची २३ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय समूहगायन स्पर्धा**मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे शालेय मंत्रिमंडळाची लोकशाही पद्धतीने निवडणूक संपन्न**उत्तर कर्नाटकात रौडींवर पोलिसांचा कडक वॉच! ५३ पथकांची विशेष मोहीम; २३ जण हद्दपार बेळगावसह पाच जिल्ह्यांत जुलैमध्ये मोठी कारवाई; १४८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई, ६ जणांवर गुंडा कायदा, पाच आरोपींवर ‘कोका’**बेळगाव–गोवा व्यावसायिक संबंधांना नवी दिशा; सौहार्द अधिक मजबूत करण्याचे आवाहन बीसीसीआयच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात; स्वप्नील शहा यांनी स्वीकारली अध्यक्षपदाची सूत्रे*