LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Education News

जीएसएसपीयू महाविद्यालयात विद्यार्थी परिषदेचा दीक्षांत सोहळा उत्साहात; नेतृत्व, जबाबदारी आणि चिकाटीचा दिला संदेश

बेळगाव | डी मीडिया

जीएसएसपीयू महाविद्यालयात विद्यार्थी परिषदेचा वार्षिक दीक्षांत सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि मोठ्या दिमाखात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची भावना आणि कर्तव्यनिष्ठा विकसित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापक आणि मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आरपीडी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभागाचे प्राध्यापक डॉ. रामकृष्ण एन. उपस्थित होते. स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एन. देसाई यांनी प्रमुख पाहुणे, प्राध्यापक आणि विद्यार्थी वर्गाचे स्वागत केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. दीपक लोखंडे यांनी करून दिला.

विद्यार्थी प्रतिनिधींना मार्गदर्शन करताना डॉ. रामकृष्ण एन. यांनी जीवनात यश मिळवण्यासाठी चिकाटी, जिद्द आणि सातत्यपूर्ण सराव यांना पर्याय नसल्याचे सांगितले. ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न करणाऱ्यांनाच यश मिळते, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.

यावेळी प्राचार्य एस. एन. देसाई यांच्या हस्ते डॉ. रामकृष्ण एन. यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

विद्यार्थी परिषदेचे समन्वयक प्रा. अनिल खांडेकर यांनी नवनियुक्त विद्यार्थी प्रतिनिधींना आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडण्याचे, महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांमधील समन्वय अधिक सक्षम करण्याचे तसेच कर्तव्यनिष्ठेने सेवा देण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात प्रत्येक विद्यार्थी प्रतिनिधीला नामफलक आणि लेखणी प्रदान करून गौरविण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध**मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर च्या सौ. शोभा राजाराम निलजकर यांना यावर्षीच्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला याबद्दल शाळेच्या एस.डी.एम.सी.कडून अभिनंदन सत्कार* *सर्वसमावेशक शालेय आरोग्य उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण**गणेशोत्सवात दुकाने रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी*