Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

सरदार ग्राउंड क्रिकेट स्पर्धेत सामाजिक बांधिलकीचा विजय; एसजी स्पोर्ट्स संघ ठरला विजेता

सरदार ग्राउंड क्रिकेट स्पर्धेत सामाजिक बांधिलकीचा विजय; एसजी स्पोर्ट्स संघ ठरला विजेता

बेळगाव :
सरदार ग्राउंड येथे आयोजित करण्यात आलेली मर्यादित षटकांची क्रिकेट स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात आणि खेळाडूवृत्तीने पार पडली. या स्पर्धेत विविध समाजातील एकूण आठ संघांनी सहभाग घेतला.

अंतिम सामन्यात एसजी स्पोर्ट्स संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत कांतारा बॉयज संघावर मात करून विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीबद्दल प्रकाश जाधव यांना प्लेअर ऑफ द टूर्नामेंट तर सचिन साहनी यांना प्लेअर ऑफ द मॅचचा बहुमान मिळाला.

या स्पर्धेचे आयोजन गंगाधर पाटील आणि सरदार ग्राउंड प्लेयर्स यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. संपूर्ण स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी शिस्त, संघभावना आणि क्रीडास्पिरिटचे दर्शन घडवले.

अंतिम सामन्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला ऐलन मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी गंगाधर पाटील, शरद पाटील, रमेश गोवेकर, इम्तियाज खाझी, राजू तेलगेरी, सुनील नायडू, इकबाल, मोशीन, अजहर, गणेश आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विजेत्या आणि उपविजेत्या संघांचे अभिनंदन करून खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

दरम्यान, स्पर्धेतील विशेष आकर्षण ठरला तो कांतारा बॉयज संघाचा सामाजिक उपक्रम. उपविजेता ठरलेल्या या संघाने मिळालेली संपूर्ण बक्षीस रक्कम शांताई वृद्धाश्रमाला देऊन सामाजिक जबाबदारीचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या या निर्णयाचे उपस्थितांनी कौतुक केले.

क्रिकेटच्या माध्यमातून समाजातील एकोपा, क्रीडा संस्कृती आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम या स्पर्धेत पाहायला मिळाला.

ICN इंडिया स्पर्धेत हेमंत शंभुचे यांचे यश

बंगळुरू येथे पार पडलेल्या ICN इंडिया राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगावचे हेमंत अनिल शंभुचे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

Men's Physique प्रकारात त्यांनी सुवर्णपदक पटकावले, तर Men's Fitness गटात रौप्यपदक मिळवून बेळगावचा गौरव वाढवला.

या यशाबद्दल मान्यवरांच्या हस्ते हेमंत शंभुचे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या मेहनतीचे आणि यशाचे उपस्थितांनी कौतुक केले.

Author
Deepak Sutar
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
माजी आमदार राजेश पाटील यांनी केला NEET टॉपर सार्थकचा गौरवसीमा लढ्याला नवी धार; मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांचा बिदर-भालकी दौराबेळगावात रस्त्यांवरील खड्ड्यांनी वाढवला अपघातांचा धोका; प्रशासनावर सवाल*मोबाईलच्या कारणावरून मित्राचा जीव घेतला; मंदिरातच घडली थरारक हत्या**सोनम वांगचूक रुग्णालयात; पत्नी गीतांजलींची औषधांबाबत स्पष्ट भूमिका**SIR सर्वेक्षणातील अडचणींबाबत किरण जाधवांची खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे धाव**बेळगावातील हनुमान मंदिरात माकडाचा शांत वावर; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल**संवेदनशीलता-जीवनानुभव यांच्या मिलाफातूनच खरी कविता जन्माला येते : कवी शिवाजी शिंदे**इंडियन कराटे क्लब, बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संघटनेच्या चार विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट प्रदान**युनियन जिमखान्यावर लष्कराचा ताबा; न्यायालयीन निर्णयानंतर अंमलबजावणी*