Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Education News

बेळगाव-खानापूरमध्ये उद्या शाळांना सुट्टी; मुसळधार पावसामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

बेळगाव-खानापूरमध्ये उद्या शाळांना सुट्टी; मुसळधार पावसामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

बेळगाव | प्रतिनिधी

बेळगाव जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत मंगळवार, 7 जुलै रोजी बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील सर्व अंगणवाडी केंद्रे, प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच इयत्ता बारावीपर्यंतची सर्व महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी जारी केले आहेत.

सततच्या पावसामुळे दोन्ही तालुक्यांतील अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ओढे आणि नाले भरून वाहत असून, सखल भागात पाणी साचल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवासात अडचणी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

ही सुट्टी बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील सर्व संबंधित शैक्षणिक संस्थांना लागू राहणार आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाची नोंद खानापूर तालुक्यात झाली असून, अनेक ठिकाणी नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. बेळगाव शहरासह तालुक्यातही दिवसभर रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.

हवामान विभागाने पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, तसेच पालकांनी मुलांना विनाकारण घराबाहेर न पाठवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*अनाथ मुलांना चांदीच्या वस्तू देऊन  मामाची भूमिका निभावणारे समाजसेवक आकाश हलगेकर* ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थीनींचा दैदिप्यमान विजय; आंतरशालेय स्पर्धेत प्रथम क्रमांकावर मोहोर !डॉ. दीपक पवार यांची महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या पदाधिकाऱ्यांशी सीमाप्रश्नावर सविस्तर चर्चा*चन्नेवाडी गावकऱ्यांच्या स्वतंत्र बूथ मागणीला यश**आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूलचा दमदार विजय; तालुका पातळीसाठी निवड**सीमाप्रश्नी पुणे विभाग समितीकडून घरोघरी जनजागृती अभियान महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग व पुणे विभाग समितीची संयुक्त बैठक**भारत विकास परिषदेची २३ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय समूहगायन स्पर्धा**मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे शालेय मंत्रिमंडळाची लोकशाही पद्धतीने निवडणूक संपन्न**उत्तर कर्नाटकात रौडींवर पोलिसांचा कडक वॉच! ५३ पथकांची विशेष मोहीम; २३ जण हद्दपार बेळगावसह पाच जिल्ह्यांत जुलैमध्ये मोठी कारवाई; १४८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई, ६ जणांवर गुंडा कायदा, पाच आरोपींवर ‘कोका’**बेळगाव–गोवा व्यावसायिक संबंधांना नवी दिशा; सौहार्द अधिक मजबूत करण्याचे आवाहन बीसीसीआयच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात; स्वप्नील शहा यांनी स्वीकारली अध्यक्षपदाची सूत्रे*