Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
National News

देशसेवेला सलाम! 24 वर्षांची गौरवशाली कारकीर्द पूर्ण करून सब मेजर मुकुंद जोशी यांची सन्माननीय निवृत्ती

देशसेवेला सलाम! 24 वर्षांची गौरवशाली कारकीर्द पूर्ण करून सब मेजर मुकुंद जोशी यांची सन्माननीय निवृत्ती

बेळगाव

भारतीय सैन्यात तब्बल 24 वर्षे निष्ठा, शिस्त आणि समर्पणाने सेवा बजावल्यानंतर आर्मी एज्युकेशनल कॉर्प्स (AEC) मधील सब मेजर मुकुंद जोशी यांनी सन्मानपूर्वक निवृत्ती स्वीकारली. त्यांच्या दीर्घ आणि उल्लेखनीय सेवेमुळे कुटुंबीयांसह निपाणी परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

निपाणीचे मूळ रहिवासी आणि सध्या गलतगा (ता. निपाणी) येथे वास्तव्यास असलेले मुकुंद जोशी यांनी 2002 मध्ये भारतीय सैन्यात प्रवेश केला. सेवाकाळात त्यांनी जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान, ईशान्य भारत तसेच हैदराबादसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. त्यांच्या सैनिकी कारकिर्दीचा समारोप बेळगाव येथील द मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (The Maratha LIRC) येथे झाला.

लष्करी सेवेदरम्यान त्यांनी विविध आर्मी पब्लिक स्कूलमध्ये अॅडमिनिस्ट्रेटर जेसीओ म्हणूनही उल्लेखनीय योगदान दिले. विशेषतः बेळगाव येथील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

सब मेजर जोशी यांच्या  पत्नी, जुळ्या मुली, आई तसेच एलआयसी एजंट म्हणून कार्यरत असलेले भाऊ मनोज जोशी असा परिवार आहे.

त्यांच्या निवृत्तीप्रसंगी कुटुंबीय, सहकारी, मित्रपरिवार आणि हितचिंतकांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील आयुष्य निरोगी, आनंदी आणि यशस्वी जावो, अशा शुभेच्छा दिल्या. देशसेवेसाठी दिलेल्या त्यांच्या योगदानाबद्दल परिसरातूनही त्यांचा गौरव करण्यात येत आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*अनाथ मुलांना चांदीच्या वस्तू देऊन  मामाची भूमिका निभावणारे समाजसेवक आकाश हलगेकर* ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थीनींचा दैदिप्यमान विजय; आंतरशालेय स्पर्धेत प्रथम क्रमांकावर मोहोर !डॉ. दीपक पवार यांची महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या पदाधिकाऱ्यांशी सीमाप्रश्नावर सविस्तर चर्चा*चन्नेवाडी गावकऱ्यांच्या स्वतंत्र बूथ मागणीला यश**आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूलचा दमदार विजय; तालुका पातळीसाठी निवड**सीमाप्रश्नी पुणे विभाग समितीकडून घरोघरी जनजागृती अभियान महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग व पुणे विभाग समितीची संयुक्त बैठक**भारत विकास परिषदेची २३ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय समूहगायन स्पर्धा**मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे शालेय मंत्रिमंडळाची लोकशाही पद्धतीने निवडणूक संपन्न**उत्तर कर्नाटकात रौडींवर पोलिसांचा कडक वॉच! ५३ पथकांची विशेष मोहीम; २३ जण हद्दपार बेळगावसह पाच जिल्ह्यांत जुलैमध्ये मोठी कारवाई; १४८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई, ६ जणांवर गुंडा कायदा, पाच आरोपींवर ‘कोका’**बेळगाव–गोवा व्यावसायिक संबंधांना नवी दिशा; सौहार्द अधिक मजबूत करण्याचे आवाहन बीसीसीआयच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात; स्वप्नील शहा यांनी स्वीकारली अध्यक्षपदाची सूत्रे*