Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*बेळगावात IPL ऑनलाईन बेटिंगवर पोलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा*

बेळगाव : आयपीएल क्रिकेट सामन्यांदरम्यान सुरू असलेल्या ऑनलाईन बेटिंगविरोधात मार्केट पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई करत सहा जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. जेल ग्राउंडजवळील मराठी शाळा परिसरात सुरू असलेल्या बेटिंग व्यवहाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला.

या कारवाईत आजाद नगर येथील सुफियान शेख हा मोबाईलच्या माध्यमातून आयपीएल सामन्यांवर पैशांची ऑनलाईन बेटिंग करत असल्याचे उघड झाले. तपासादरम्यान त्याच्यासोबत अमननगर, शहापूर आणि खंजर गल्ली परिसरातील काही युवकही या व्यवहारात सहभागी असल्याचे समोर आले.

मार्केट पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर आणि त्यांच्या पथकाने कारवाई करत संशयिताला ताब्यात घेतले. पोलिसांनी घटनास्थळावरून बेटिंगसाठी वापरण्यात आलेला मोबाईल फोन तसेच ५ हजार ६०० रुपयांची रोख रक्कम जप्त केली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे १० हजार ६०० रुपये असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणी संबंधित सहा जणांविरोधात मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे
Advertisement

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बाकनूर-बडस फाट्यावर अखेर नामफलक; प्रवाशांची मोठी गैरसोय संपली**बेळगाव पोलिसांची मोठी कारवाई; 24 तासांत 29 लाखांच्या दोन कार जप्त**रामतीर्थनगरमध्ये बुडा जमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न; नागरिकांच्या आंदोलनानंतर भिंत पाडली**नितीन जाधव यांच्या हस्तक्षेपाने हिंदवाडीतील पाणी समस्या मार्गी**वाढदिवशीच बीएससी विद्यार्थिनीची आत्महत्या; बेळगाव हादरले**जिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा 2026 उत्साहात पार**मराठी विद्यानिकेतन अटल टिंकरिंग लॅबतर्फे अनोखा तंत्रज्ञानाचा कॅम्प**प्यास फाऊंडेशन ने विक्रमी वेळेत केले तलावाचे काम**बेळगावात IPL ऑनलाईन बेटिंगवर पोलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा**मोदींचा इशारा: परदेश प्रवास टाळा, सोनं खरेदी करू नका*