Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Politics News

*एसआयआर प्रक्रियेत सहभागी व्हा; सकल मराठा समाजाचे बेळगावात आवाहन*

कर्नाटकात सुरू असलेल्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) अर्थात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकन प्रक्रियेत सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन बेळगाव येथील सकल मराठा समाजाने केले आहे.

समाजाचे समन्वयक किरण जाधव यांनी प्रसिद्ध केलेल्या आवाहनात, मतदार यादीतील प्रत्येक नागरिकाची माहिती, कुटुंबाची नोंद आणि पत्त्याची अचूक पडताळणी होत असल्याने ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

आवाहनात म्हटले आहे की, समाजातील एकही नागरिक या प्रक्रियेपासून वंचित राहू नये. भविष्यात मतदानाचा अधिकार बजावताना किंवा विविध शासकीय योजनांचा लाभ घेताना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी सर्वांनी आवश्यक माहिती वेळेत संबंधित बीएलओकडे सादर करावी.

समाजाच्या मते, या प्रक्रियेमुळे मतदार यादीतील माहिती अचूक राहण्यास मदत होईल. तसेच भविष्यातील शासकीय नोंदी आणि योजनांसाठी आवश्यक असलेला डेटा अधिक विश्वासार्ह होईल. याशिवाय मराठा समाजाची अधिकृत लोकसंख्या आणि माहिती योग्य प्रकारे नोंदवली जाण्यासही या प्रक्रियेचा फायदा होणार असल्याचे आवाहनात नमूद करण्यात आले आहे.

सर्व समाजबांधवांनी निर्धारित फॉर्म काळजीपूर्वक भरून आपल्या परिसरातील संबंधित बीएलओ कार्यालयात जमा करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.

एसआयआर प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी इच्छुकांनी सकल मराठा समाजाच्या जनसंपर्क कार्यालयाशी, गुडशेड रोड, बेळगाव येथे संपर्क साधावा किंवा समन्वयक किरण जाधव यांच्याशी ९४४८१३५८०७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*अनाथ मुलांना चांदीच्या वस्तू देऊन  मामाची भूमिका निभावणारे समाजसेवक आकाश हलगेकर* ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थीनींचा दैदिप्यमान विजय; आंतरशालेय स्पर्धेत प्रथम क्रमांकावर मोहोर !डॉ. दीपक पवार यांची महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या पदाधिकाऱ्यांशी सीमाप्रश्नावर सविस्तर चर्चा*चन्नेवाडी गावकऱ्यांच्या स्वतंत्र बूथ मागणीला यश**आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूलचा दमदार विजय; तालुका पातळीसाठी निवड**सीमाप्रश्नी पुणे विभाग समितीकडून घरोघरी जनजागृती अभियान महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग व पुणे विभाग समितीची संयुक्त बैठक**भारत विकास परिषदेची २३ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय समूहगायन स्पर्धा**मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे शालेय मंत्रिमंडळाची लोकशाही पद्धतीने निवडणूक संपन्न**उत्तर कर्नाटकात रौडींवर पोलिसांचा कडक वॉच! ५३ पथकांची विशेष मोहीम; २३ जण हद्दपार बेळगावसह पाच जिल्ह्यांत जुलैमध्ये मोठी कारवाई; १४८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई, ६ जणांवर गुंडा कायदा, पाच आरोपींवर ‘कोका’**बेळगाव–गोवा व्यावसायिक संबंधांना नवी दिशा; सौहार्द अधिक मजबूत करण्याचे आवाहन बीसीसीआयच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात; स्वप्नील शहा यांनी स्वीकारली अध्यक्षपदाची सूत्रे*