LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*बेळगाव–गोवा व्यावसायिक संबंधांना नवी दिशा; सौहार्द अधिक मजबूत करण्याचे आवाहन बीसीसीआयच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात; स्वप्नील शहा यांनी स्वीकारली अध्यक्षपदाची सूत्रे*

बेळगाव आणि गोवा या दोन्ही प्रदेशांमध्ये व्यावसायिक, औद्योगिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अनेक वर्षांपासून घनिष्ठ संबंध आहेत. हे परस्पर सहकार्य आणि सौहार्द भविष्यात आणखी व्यापक करण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या अध्यक्षा प्रतिमा धोंड यांनी केले.

उद्यमबाग येथील फाउंड्री क्लस्टर सभागृहात शुक्रवारी सायंकाळी बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (BCCI) च्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रतिमा धोंड उपस्थित होत्या.

बेळगाव आणि गोवा यांच्यातील संबंध हे केवळ भौगोलिक जवळिकीपुरते मर्यादित नसून व्यापार, उद्योग आणि संस्कृतीच्या माध्यमातून ते अधिक घट्ट झाले आहेत. बेळगावातील अनेक उद्योजकांनी गोव्यात व्यवसायाचा विस्तार केला असून, दोन्ही राज्यांमध्ये उद्योग, कौशल्यविकास आणि अन्य क्षेत्रांत सहकार्याची चांगली परंपरा आहे, असे धोंड यांनी नमूद केले.

गोवा चेंबर आणि बेळगाव चेंबर यांच्यातही सकारात्मक संबंध आहेत. या संबंधांना अधिक बळकटी देण्यासाठी भविष्यात संयुक्त उपक्रम आणि सहकार्य वाढविण्यास गोवा चेंबर उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.

चेंबर ऑफ कॉमर्ससारख्या संस्थेची जबाबदारी स्वीकारताना पदाधिकाऱ्यांनी वेळ, बांधिलकी आणि प्रामाणिकपणे काम करण्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. बेळगाव चेंबरच्या विविध उपक्रमांकडे आपण सातत्याने लक्ष ठेवून असून, यापूर्वीही चेंबरच्या कार्यक्रमांना उपस्थित राहिल्याचे त्यांनी सांगितले.

बेळगावच्या उद्योग क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग ही सकारात्मक बाब असल्याचेही प्रतिमा धोंड यांनी अधोरेखित केले.

स्वप्नील शहा यांनी स्वीकारली अध्यक्षपदाची सूत्रे

सोहळ्यात स्वप्नील शहा यांनी बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. मनोजकुमार एन. मत्तिकोप्प यांनी मानद सचिवपदाची जबाबदारी स्वीकारली.

याशिवाय उदय जोशी यांनी वरिष्ठ उपाध्यक्ष, राजेंद्र मुतगेकर यांनी द्वितीय उपाध्यक्ष, विनित हरकुणी यांनी संयुक्त सचिव, तर रमेश लद्दड यांनी कोषाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला.

सन 2026–27 साठी संचालक मंडळाच्या सदस्यांनीही यावेळी पदभार स्वीकारला. नव्या कार्यकाळात चेंबरच्या माध्यमातून उद्योग व व्यापार क्षेत्राशी संबंधित विविध प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात संगीता कटारिया यांच्या प्रार्थनेने झाली. मावळते अध्यक्ष प्रभाकर नागरमुन्नोळी यांनी उपस्थितांचे स्वागत करत आपल्या कार्यकाळातील प्रमुख उपक्रमांचा आढावा घेतला. मावळते मानद सचिव सतीश कुलकर्णी यांनी वार्षिक अहवाल सादर केला.

अनिता कणबर्गी यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. उपाध्यक्ष राजेंद्र मुतगेकर यांनी नूतन अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिषेक मुतगेकर यांनी केले, तर नूतन मानद सचिव मनोज मत्तिकोप्प यांनी आभार मानले.

बीसीसीआयचे माजी अध्यक्ष, विद्यमान व माजी पदाधिकारी, सदस्य, विविध व्यापारी व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, उद्योजक आणि मान्यवरांची कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध**मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर च्या सौ. शोभा राजाराम निलजकर यांना यावर्षीच्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला याबद्दल शाळेच्या एस.डी.एम.सी.कडून अभिनंदन सत्कार* *सर्वसमावेशक शालेय आरोग्य उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण**गणेशोत्सवात दुकाने रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी*