LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News | Health & Fitness

हिंडलगा कारागृहातील कैद्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर; KLE रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाची सेवा

बेळगाव : हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना वेळेवर वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात कारागृहातील कैद्यांची विविध आरोग्यविषयक तपासणी करण्यात आली.
KLE रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या पथकाने हिंडलगा कारागृहात भेट देऊन कैद्यांची सर्वसमावेशक आरोग्य तपासणी केली. तपासणीदरम्यान काही कैद्यांना उपचाराची आवश्यकता असल्याचे आढळून आल्यानंतर त्यांना आवश्यक औषधांचे वितरणही करण्यात आले.
या आरोग्य उपक्रमासाठी JNMC Charitable Hospitalचे प्राचार्य डॉ. राजेश पवार, आर. एस. मुधोळ तसेच डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले. त्यांच्या सहकार्यामुळे शिबिराचे नियोजन आणि अंमलबजावणी सुरळीतपणे पार पडली.
कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आय. पी. गडदाड आणि माजी महापौर विजय मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कारागृहाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सरस्वती, KLE Charitable Hospitalचे PRO बसवराज, हिंडलगा कारागृहातील अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.
कारागृहातील कैद्यांच्या आरोग्याची नियमित काळजी घेणे आणि आवश्यक उपचार वेळेत उपलब्ध करून देणे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले. डॉक्टर, रुग्णालयातील कर्मचारी आणि कारागृह प्रशासनाने समन्वयाने काम करत शिबिर यशस्वी केल्याबद्दल आयोजकांकडून सर्वांचे कौतुक करण्यात आले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*स्कायवर्ल्ड एव्हिएशन अकॅडमीच्या तीन विद्यार्थिनींची बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर निवड**आंदोलनापूर्वीच ध्रुव राठी पोलिसांच्या ताब्यात; जंतरमंतरवरील आंदोलनाआधी मोठी कारवाई**राजकीय रणनीती, निवडणूक सर्वेक्षण अन् डिजिटल प्रचार; बेळगावात ‘STRATAGEM Matrix’चे नवे कार्यालय सुरू**दुर्गामाता दौडीपूर्वीच शास्त्री नगरमधील रस्त्याची दुरवस्था; भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर**Skyworld Aviation Academy मध्ये मॉकटेल प्रेझेंटेशन स्पर्धा उत्साहात; विद्यार्थ्यांनी दाखवली सर्जनशीलता आणि आत्मविश्वास**नाना पाटेकरांना रांगोळीतून भावपूर्ण श्रद्धांजली; अजित औरवडकर यांची 8 तासांची कलासाधना**संकेश्वरजवळ भीषण अपघात! टिपरला केएसआरटीसी बसची धडक; चालकाचा मृत्यू, 12 प्रवासी गंभीर**विद्याभारती राष्ट्रीय मुलींच्या फुटबॉल स्पर्धाला प्रारंभ**राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत बेळगांव च्या स्केटिंग पटू ची चमकदार कामगिरी**मृणाल हेब्बाळकर यांनी दिवंगत नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली*