LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Politics News

*लक्ष्मी हेब्बाळकरांना मंत्रिमंडळात पुन्हा संधी द्या; सोनिया गांधींकडे ऑल इंडिया दलित यूथ ऑर्गनायझेशन युवा संघटनेची मागणी*

बेळगाव ग्रामीणच्या काँग्रेस आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना आगामी कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तारात पुन्हा कॅबिनेट मंत्री म्हणून संधी देण्यात यावी, अशी मागणी ऑल इंडिया दलित यूथ ऑर्गनायझेशन (R), नवी दिल्ली यांच्याकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्याकडे निवेदन पाठविण्यात आले आहे.

संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लेश जी. चौगुले यांच्या नेतृत्वाखालील संघटनेने या निवेदनातून लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा उल्लेख केला आहे. बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून त्या दोन वेळा काँग्रेसच्या आमदार म्हणून निवडून आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महिला विभागाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेल्या कामाचाही दाखला देण्यात आला आहे. यापूर्वी कर्नाटक सरकारमध्ये महिला व बालकल्याण विभागाची जबाबदारी सांभाळताना महिलांच्या कल्याणासाठी त्यांनी काम केल्याचे संघटनेने म्हटले आहे.

विशेषतः ‘गृहलक्ष्मी’ योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक आधार देण्याच्या उपक्रमाचा निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे. या योजनेचा राज्यातील महिलांना मोठ्या प्रमाणावर लाभ झाल्याचा दावा संघटनेने केला आहे.

लक्ष्मी हेब्बाळकर यांनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी काम केल्याचेही निवेदनात नमूद आहे. त्यामुळे कर्नाटकातील महिला नेतृत्वाला योग्य प्रतिनिधित्व देण्यासाठी त्यांच्या नावाचा आगामी मंत्रिमंडळ विस्तारात गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

“लक्ष्मी हेब्बाळकर यांना मंत्रिमंडळात स्थान देणे म्हणजे महिला नेतृत्वाला आणि सामाजिक न्यायाच्या भूमिकेला बळ देणे ठरेल,” अशी भूमिका संघटनेने निवेदनातून मांडली आहे.

आगामी मंत्रिमंडळ विस्तारात लक्ष्मी हेब्बाळकर यांना पुन्हा संधी मिळणार का, याकडे आता बेळगावसह कर्नाटकातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

या निवेदनाच्या प्रति विरोधी पक्षनेते लोकसभा राहुल गांधी, ए आय सी सी अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी के शिवकुमार , आयसीसी कर्नाटक प्रभारी सुरजेवाला यांना पाठवण्यात आली आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध**मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर च्या सौ. शोभा राजाराम निलजकर यांना यावर्षीच्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला याबद्दल शाळेच्या एस.डी.एम.सी.कडून अभिनंदन सत्कार* *सर्वसमावेशक शालेय आरोग्य उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण**गणेशोत्सवात दुकाने रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी*