LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Politics News

*लक्ष्मी हेब्बाळकर यांना मंत्रिपद द्या; समर्थकांचे अर्धनग्न आंदोलन, सरकारला इशारा*

बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान द्यावे, या मागणीसाठी त्यांच्या समर्थकांनी बेळगाव तालुक्यातील बडस के.एच. क्रॉस येथे अर्धनग्न आंदोलन करत तीव्र नाराजी व्यक्त केली.

आंदोलकांनी सरकार आणि काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाकडे लक्ष वेधत, लक्ष्मी हेब्बाळकर यांना मंत्रिमंडळात तातडीने संधी देण्याची मागणी केली. त्यांच्या मते, पक्ष संघटन बळकट करणे तसेच मतदारसंघातील विकासकामांमध्ये त्यांनी सातत्याने सक्रिय भूमिका बजावली असून त्यांच्या कार्याची योग्य दखल घेतली जावी.

प्रदर्शनादरम्यान आंदोलकांनी घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही दिला.

या आंदोलनात काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा पदाधिकारी मनसूर अली अत्तार यांच्यासह अशोक अंगडी, पर्वतगौडा पाटील, रवी मेळेद, प्रकाश पाटील, बसवंत नाईक आणि इतर काँग्रेस कार्यकर्ते व लक्ष्मी हेब्बाळकर यांचे समर्थक सहभागी झाले.

या आंदोलनामुळे बेळगावच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर या मागणीकडे लक्ष वेधले जात आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध**मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर च्या सौ. शोभा राजाराम निलजकर यांना यावर्षीच्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला याबद्दल शाळेच्या एस.डी.एम.सी.कडून अभिनंदन सत्कार* *सर्वसमावेशक शालेय आरोग्य उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण**गणेशोत्सवात दुकाने रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी*