LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Crime News

गोकाकजवळ भीषण अपघात; बस-दुचाकीच्या समोरासमोर धडकेत वडील, चिमुकलीसह तिघांचा जागीच मृत्यू

गोकाकजवळ भीषण अपघात; बस-दुचाकीच्या समोरासमोर धडकेत वडील, चिमुकलीसह तिघांचा जागीच मृत्यू

गोकाक | डी मीडिया

बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील कोण्णूर गावाजवळ गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण रस्ता अपघातात वडील, त्यांची चार वर्षीय मुलगी आणि आणखी एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. हिडकलहून गोकाकच्या दिशेने येणाऱ्या प्रवासी बस आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाल्याने हा हृदयद्रावक अपघात घडला.

या अपघातात सैफ मुल्ला (वय 29), त्यांची मुलगी सिजा मुल्ला (वय 4) आणि इम्तियाज भडगाव (वय 35) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, सैफ मुल्ला हे आपल्या लाडक्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. मात्र, नियतीने त्यांच्या प्रवासालाच दुर्दैवी पूर्णविराम दिला.

घटनेनंतर बसचालकाने बस घटनास्थळीच सोडून तेथून पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच गोकाक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध**मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर च्या सौ. शोभा राजाराम निलजकर यांना यावर्षीच्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला याबद्दल शाळेच्या एस.डी.एम.सी.कडून अभिनंदन सत्कार* *सर्वसमावेशक शालेय आरोग्य उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण**गणेशोत्सवात दुकाने रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी*