Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
National News

माजी सैनिकांनी सरकारी सवलतींचा लाभ घ्यावा : खासदार प्रियांका जारकीहोळी

निप्पाणी तालुक्यात माजी सैनिक भवनाच्या बांधकामास प्रारंभ

निप्पाणी : देशाच्या संरक्षणासाठी आयुष्य वेचणारे सैनिक हेच आपल्या सुरक्षित जीवनाचे खरे शिल्पकार असल्याचे मत चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी व्यक्त केले. माजी सैनिकांनी देशासाठी दिलेल्या अमूल्य सेवेच्या बदल्यात सरकारकडून मिळणाऱ्या सुविधा आणि सवलतींचा योग्य लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
निप्पाणी तालुक्यातील तवंदी गावात खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधी (MPLADS) अंतर्गत २० लाख रुपयांच्या खर्चातून उभारण्यात येणाऱ्या माजी सैनिक भवनाच्या भूमिपूजन सोहळ्यात त्या बोलत होत्या.
खासदार जारकीहोळी म्हणाल्या की, देशाच्या सीमेवर सतत सज्ज असलेले सैनिक आपल्यासाठी शांतता आणि सुरक्षितता सुनिश्चित करतात. निवृत्तीनंतरही त्यांच्या सन्मानात कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी माजी सैनिकांसाठी असलेल्या योजना आणि सुविधा अधिक प्रभावीपणे राबवण्यात येतील. तवंदी येथे उभारण्यात येणारे माजी सैनिक भवन लवकरच पूर्ण होऊन ते माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
त्या पुढे म्हणाल्या की, शेतकरी, सैनिक आणि कामगार हे देशाचे खरे आधारस्तंभ आहेत. या तीन घटकांच्या योगदानाशिवाय देशाची प्रगती शक्य नाही. त्यामुळे देशसेवेनंतर माजी सैनिकांनीही आत्मविश्वासाने पुढे येत सरकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास बेळगाव बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, नेते उत्तम पाटील, सुप्रिया पाटील, सुजय पाटील,
तवंदी ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी कांबळे, उपाध्यक्ष संजय पाटील, निप्पाणी तालुक्यातील माजी सैनिक, ग्रामस्थ व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*अनाथ मुलांना चांदीच्या वस्तू देऊन  मामाची भूमिका निभावणारे समाजसेवक आकाश हलगेकर* ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थीनींचा दैदिप्यमान विजय; आंतरशालेय स्पर्धेत प्रथम क्रमांकावर मोहोर !डॉ. दीपक पवार यांची महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या पदाधिकाऱ्यांशी सीमाप्रश्नावर सविस्तर चर्चा*चन्नेवाडी गावकऱ्यांच्या स्वतंत्र बूथ मागणीला यश**आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूलचा दमदार विजय; तालुका पातळीसाठी निवड**सीमाप्रश्नी पुणे विभाग समितीकडून घरोघरी जनजागृती अभियान महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग व पुणे विभाग समितीची संयुक्त बैठक**भारत विकास परिषदेची २३ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय समूहगायन स्पर्धा**मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे शालेय मंत्रिमंडळाची लोकशाही पद्धतीने निवडणूक संपन्न**उत्तर कर्नाटकात रौडींवर पोलिसांचा कडक वॉच! ५३ पथकांची विशेष मोहीम; २३ जण हद्दपार बेळगावसह पाच जिल्ह्यांत जुलैमध्ये मोठी कारवाई; १४८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई, ६ जणांवर गुंडा कायदा, पाच आरोपींवर ‘कोका’**बेळगाव–गोवा व्यावसायिक संबंधांना नवी दिशा; सौहार्द अधिक मजबूत करण्याचे आवाहन बीसीसीआयच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात; स्वप्नील शहा यांनी स्वीकारली अध्यक्षपदाची सूत्रे*