LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Education News

*प्रतिकूल परिस्थितीतही मराठी शाळांच्या संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा – आबासाहेब दळवी*

खानापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये वाढते स्थलांतर, बदलती सामाजिक परिस्थिती आणि इतर विविध कारणांमुळे सरकारी मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे.

मात्र या प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी पालक, शिक्षक, ग्रामस्थ आणि समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे प्रयत्न करून मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले.

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने गुरुवारी मेंढेगाळी, हत्तररवाड, हलगा, मेरडा, करजगी, नागरगाळी, कृष्णनगर आदी परिसरातील सरकारी मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल तसेच अन्य आवश्यक शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी उपस्थित विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना मार्गदर्शन करताना आबासाहेब दळवी यांनी मराठी शाळा टिकल्या तरच मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मिता टिकणार आहे. मराठी शाळा केवळ शिक्षणाचे केंद्र नसून त्या आपल्या सांस्कृतिक परंपरेच्या जतनाचे माध्यम आहेत.

त्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याला मराठी शाळेत प्रवेश देण्यास प्राधान्य द्यावे. शिक्षकांनीही गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांशी आत्मीयता आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून शाळेबद्दल आकर्षण निर्माण करावे.

सीमाभागातील मराठी शाळा टिकविणे ही केवळ शिक्षकांची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकाचे ते राष्ट्रीय आणि सामाजिक कर्तव्य आहे. गावागावातील नागरिकांनी मराठी शाळांच्या प्रगतीसाठी सहकार्य करावे, शाळांमध्ये विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबवावेत आणि विद्यार्थ्यांना आवश्यक ते सर्वतोपरी प्रोत्साहन द्यावे. मराठी शाळा सक्षम झाल्यास भावी पिढीमध्ये मातृभाषेप्रती प्रेम, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होईल असे मत व्यक्त केले. 

ॲड अभिजीत सरदेसाई, राजाराम देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले. मिलिंद देसाई यांनी युवा समितीतर्फे हाती घेण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. शैक्षणिक साहित्य वितरण झाल्यानंतर शाळा सुधारणा कमिटी व विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या या उपक्रमाचे स्वागत करून अशा सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड वाढण्यास मदत होत असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याबरोबरच मराठी शाळांबद्दल जनजागृती करण्याचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत व्यक्त केले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध**मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर च्या सौ. शोभा राजाराम निलजकर यांना यावर्षीच्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला याबद्दल शाळेच्या एस.डी.एम.सी.कडून अभिनंदन सत्कार* *सर्वसमावेशक शालेय आरोग्य उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण**गणेशोत्सवात दुकाने रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी*