Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Entertainment News

*युवा समितीच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी*

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ जयंती युवा समिती कार्यालय टिळकवाडी बेळगाव येथे साजरी करण्यात आली.

अध्यक्ष अंकुश केसरकर आणि खजिनदार विनायक कावळे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना अध्यक्ष अंकुश केसरकर म्हणाले की बाबासाहेबांनी लोकशाही बळकट करण्यासाठी आणि आपले हक्क मिळविण्यासाठी शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा असे सांगितले होते.

तेव्हा आपण संघटित होऊन सीमाप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. तसेच आजच्या काळात बाबासाहेबांच्या विचारांवर चालायची गरज असून सिमालढा आजपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाहीची तत्वे आखून दिली आहेत त्यानुसारच लढला जात आहे आणि याच लोकशाही मार्गाने न्याय नक्की मिळेल अशी आशा व्यक्त केली.

यावेळी सरचिटणीस श्रीकांत कदम, उपाध्यक्ष वासू सामजी,विनायक कावळे,किरण हुद्दार, सुरज कुडूचकर,राकेश सावंत, महांतेश अलगोंडि, आकाश भेकणे, प्रतीक पाटील, महेश चौगुले, अश्वजीत चौधरी, विशाल गौंडाडकर आदी उपस्थित होते

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*अनाथ मुलांना चांदीच्या वस्तू देऊन  मामाची भूमिका निभावणारे समाजसेवक आकाश हलगेकर* ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थीनींचा दैदिप्यमान विजय; आंतरशालेय स्पर्धेत प्रथम क्रमांकावर मोहोर !डॉ. दीपक पवार यांची महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या पदाधिकाऱ्यांशी सीमाप्रश्नावर सविस्तर चर्चा*चन्नेवाडी गावकऱ्यांच्या स्वतंत्र बूथ मागणीला यश**आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूलचा दमदार विजय; तालुका पातळीसाठी निवड**सीमाप्रश्नी पुणे विभाग समितीकडून घरोघरी जनजागृती अभियान महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग व पुणे विभाग समितीची संयुक्त बैठक**भारत विकास परिषदेची २३ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय समूहगायन स्पर्धा**मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे शालेय मंत्रिमंडळाची लोकशाही पद्धतीने निवडणूक संपन्न**उत्तर कर्नाटकात रौडींवर पोलिसांचा कडक वॉच! ५३ पथकांची विशेष मोहीम; २३ जण हद्दपार बेळगावसह पाच जिल्ह्यांत जुलैमध्ये मोठी कारवाई; १४८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई, ६ जणांवर गुंडा कायदा, पाच आरोपींवर ‘कोका’**बेळगाव–गोवा व्यावसायिक संबंधांना नवी दिशा; सौहार्द अधिक मजबूत करण्याचे आवाहन बीसीसीआयच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात; स्वप्नील शहा यांनी स्वीकारली अध्यक्षपदाची सूत्रे*