Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Politics News

*मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”*


बेळगाव : मतदार यादी पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेत कोणताही पात्र मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये, यासाठी बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आढावा घेतला.

बैठकीनंतर डी मिडियाशी बोलताना अभय पाटील यांनी मतदार यादीतील त्रुटी आणि प्रलंबित बाबी तातडीने दुरुस्त करून यादी अंतिम करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले.

“कोणत्याही राजकीय पक्षाचा, भाषा, जात किंवा धर्माचा विचार न करता प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

दक्षिण मतदारसंघात इतर मतदारसंघातील मतदारांची नावे समाविष्ट केली जात असल्याच्या तक्रारी आपल्याकडे आल्याचा दावा करत, याबाबत अधिकाऱ्यांनी निष्पक्षपणे काम करावे, अशी सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.

मतदार यादीतून सुमारे ३० हजार मतदार बाहेर असल्याची माहिती समोर आली असून, त्यांची पडताळणी करून आवश्यक सुधारणा लवकरात लवकर करावी, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, राज्यातील काँग्रेस सरकारच्या हमी योजनांवरही अभय पाटील यांनी टीका केली. निवडणुकीच्या काळात जाहीर केलेल्या योजनांची अंमलबजावणी आता का होत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

गृहलक्ष्मी योजनेतील दरमहा मिळणाऱ्या २ हजार रुपयांच्या मदतीबाबत प्रश्न उपस्थित करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
“जर सरकारने हमी योजना जाहीर केल्या असतील तर त्या सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळाल्या पाहिजेत. जनतेच्या प्रश्नांसाठी भाजप सातत्याने आवाज उठवत राहील,” असे अभय पाटील यांनी सांगितले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*अनाथ मुलांना चांदीच्या वस्तू देऊन  मामाची भूमिका निभावणारे समाजसेवक आकाश हलगेकर* ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थीनींचा दैदिप्यमान विजय; आंतरशालेय स्पर्धेत प्रथम क्रमांकावर मोहोर !डॉ. दीपक पवार यांची महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या पदाधिकाऱ्यांशी सीमाप्रश्नावर सविस्तर चर्चा*चन्नेवाडी गावकऱ्यांच्या स्वतंत्र बूथ मागणीला यश**आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूलचा दमदार विजय; तालुका पातळीसाठी निवड**सीमाप्रश्नी पुणे विभाग समितीकडून घरोघरी जनजागृती अभियान महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग व पुणे विभाग समितीची संयुक्त बैठक**भारत विकास परिषदेची २३ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय समूहगायन स्पर्धा**मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे शालेय मंत्रिमंडळाची लोकशाही पद्धतीने निवडणूक संपन्न**उत्तर कर्नाटकात रौडींवर पोलिसांचा कडक वॉच! ५३ पथकांची विशेष मोहीम; २३ जण हद्दपार बेळगावसह पाच जिल्ह्यांत जुलैमध्ये मोठी कारवाई; १४८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई, ६ जणांवर गुंडा कायदा, पाच आरोपींवर ‘कोका’**बेळगाव–गोवा व्यावसायिक संबंधांना नवी दिशा; सौहार्द अधिक मजबूत करण्याचे आवाहन बीसीसीआयच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात; स्वप्नील शहा यांनी स्वीकारली अध्यक्षपदाची सूत्रे*