घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे काम सुरू केले. अग्निशमन दलाच्या जलद कारवाईमुळे आग अधिक पसरण्यापासून रोखता आली.
ही घटना माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे. सिलेंडर स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तांत्रिक तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे सिलेंडर सुरक्षेबाबत जनजागृती मोहीम राबवण्याची मागणी केली आहे.
Also read
