Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Crime News

*मोबाईलच्या कारणावरून मित्राचा जीव घेतला; मंदिरातच घडली थरारक हत्या*

 मोबाईलच्या किरकोळ कारणावरून दोन मित्रांमध्ये झालेला वाद थेट हत्येपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील चिक्कबुदनूर गावातील लक्ष्मी मंदिराच्या आवारात शुक्रवारी सायंकाळी घडली.

या घटनेत फकीरप्पा पेड्डेन्नावर (वय 40) यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, फकीरप्पा हे मंदिराच्या परिसरात विश्रांती घेत असताना त्यांचा मित्र मल्लिकार्जुन पूजेरे तेथे आला. त्याने आपला मोबाईल परत देण्याची मागणी केली.

मात्र, फकीरप्पा यांनी मोबाईल तात्काळ न देता रात्री देतो, असे सांगितल्याने दोघांमध्ये वाद झाला. या वादाच्या भरात संतापलेल्या मल्लिकार्जुनने मंदिरात कापूर प्रज्वलित करण्यासाठी वापरला जाणारा दगड उचलून फकीरप्पा यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला.
या हल्ल्यात फकीरप्पा गंभीर जखमी झाले आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच मुरगोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*अनाथ मुलांना चांदीच्या वस्तू देऊन  मामाची भूमिका निभावणारे समाजसेवक आकाश हलगेकर* ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थीनींचा दैदिप्यमान विजय; आंतरशालेय स्पर्धेत प्रथम क्रमांकावर मोहोर !डॉ. दीपक पवार यांची महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या पदाधिकाऱ्यांशी सीमाप्रश्नावर सविस्तर चर्चा*चन्नेवाडी गावकऱ्यांच्या स्वतंत्र बूथ मागणीला यश**आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूलचा दमदार विजय; तालुका पातळीसाठी निवड**सीमाप्रश्नी पुणे विभाग समितीकडून घरोघरी जनजागृती अभियान महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग व पुणे विभाग समितीची संयुक्त बैठक**भारत विकास परिषदेची २३ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय समूहगायन स्पर्धा**मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे शालेय मंत्रिमंडळाची लोकशाही पद्धतीने निवडणूक संपन्न**उत्तर कर्नाटकात रौडींवर पोलिसांचा कडक वॉच! ५३ पथकांची विशेष मोहीम; २३ जण हद्दपार बेळगावसह पाच जिल्ह्यांत जुलैमध्ये मोठी कारवाई; १४८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई, ६ जणांवर गुंडा कायदा, पाच आरोपींवर ‘कोका’**बेळगाव–गोवा व्यावसायिक संबंधांना नवी दिशा; सौहार्द अधिक मजबूत करण्याचे आवाहन बीसीसीआयच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात; स्वप्नील शहा यांनी स्वीकारली अध्यक्षपदाची सूत्रे*