मुंबई:येथील वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये शुक्रवारपासून तिसरी आणि अखेरची कसोटी खेळली जात आहे. खेळाच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर कॉनवे आणि टॉम लॅथम यांनी सावध सुरुवात केली. न्यूझीलंडच्या 15 धावा झाल्या असताना न्यूझीलंडला पहिला धक्का बसला.
आकाशदीपने कॉन्व्हेला पायाचीत करून भारताला पहिले यश दिले. त्यानंतर विल यंग आणि टॉम लेथम यांनी सावध खेळी केली. त्यांनी दुसऱ्या गड्यासाठी महत्त्वपूर्ण 44 धावांची भागीदारी केली. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर याने टॉम ला 28 धावांवर त्रिफळाचित केले. त्यावेळी न्यूझीलंडच्या धावफलकावर 59 धावा लागल्या होत्या. वाशिंग्टन सुंदर याने रचीन रवींद्रला अवघ्या पाच धावांवर बाद केले. त्यावेळी न्यूझीलंडच्या 72 धावा झाल्या होत्या. शुक्रवारी पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रातील खेळ थांबला तेव्हा न्युझीलँड ने तीन बाद 92 धावा केल्या होत्या.
न्युझीलँड तर्फे टॉम लेथम याने 28, कॉनवे यांन याने चार, रवींद्र ने 5 धावा केल्या. तर विल यंग 38 धावांवर आणि मिचेल 11 धावांवर नाबाद आहेत. दिवसभरात भारताला न्यूझीलंडच्या फलंदाजांना झटपट बाद करणे गरजेचे आहे. भारताने पहिल्या सत्रामध्ये न्युझीलँडला अवांतराच्या रूपात सहा धावा दिल्या.
बेंगलोर येथील पहिली कसोटी न्यूझीलंडने आठ गड्यांनी आणि पुणे येथील दुसरी कसोटी न्यूझीलंडने 113 धावांनी जिंकून मालिका या आधीच दोन शून्य अशी जिंकली आहे. त्यामुळे भारताला डब्लू टी सी च्या पॉइंट टेबल मध्ये आपले स्थान आणखी भक्कम करण्यासाठी कोणत्या स्थितीत ही कसोटी जिंकणे गरजेचे आहे. या कसोटीसाठी ऐनवेळी बुमराला विश्रांती देऊन त्याच्या जागी आकाशदीपला संधी देण्यात आली आहे.