तक्रार करून देखील महापालिकेचे दुर्लक्ष
शहापूर येथील मध्यवर्ती भागात असणाऱ्या नाथ पै चौक परिसरात मुख्य मार्गावर चेंबर खुला आहे. रस्त्यामध्ये चेंबर असल्याने रात्रीच्यावेळी पाय अडकून अपघात होत आहेत.
या संदर्भात मनपाकडे तक्रार करण्यात आली असून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. यामुळे शहापूरमधील नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
नाथ पै चौक ते अंबाबाई मंदिर रस्त्यावर एक चेंबर आहे. अंदाजे २ फूट खोल असा हा चेंबर मुख्य रस्त्यावरच आहे. यामुळे दररोज शेकडो नागरिक यावरून ये-जा करीत असतात.
चेंबर असल्याचे नजरेस पडत नसल्याने अपघात होतआहेत.. लहान मुलांचा पाय चेंबरमध्ये जात असल्याने धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हा चेंबर बंद करावा अशी मागणी स्थानिक नागरिक व्यापारी करीत आहेत.