रायबाग तालुक्यातील कुडची येथे एन डी आर एफ ची बोट उलटून दोन जण नदीत पडले पण झाडाच्या फांदीचा आधार मिळाल्याने दोघेही आश्चर्यकारक रित्या बचावले. कुडची येथील कृष्णा नदीत असणाऱ्या जॅकवेल ची दुरुस्ती करण्यासाठी एन डी आर एफ चे जवान आणि एक लाईनमन ,एक व्हॉल्वमन बोटीतून निघाले होते.
नदीच्या पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने बोट उलटली आणि लाईनमन,व्हॉल्वमन नदीत पडले.नदीत वाहून जात असताना सुदैवाने त्या दोघांच्या हाताला एका झाडाची फांदी लागली.त्या फांदीला धरून त्यांनी स्वतःला बुडण्यापासून वाचवले.लगेच एन डी आर एफ च्या दुसऱ्या बोटीतून आणखी जवान नदीत गेले आणि त्यांनी झाडाची फांदी धरून बसलेल्या दोघांना बोटीत घेतले .यावेळी नदीच्या किनाऱ्यावर बघ्यांची गर्दी जमली होती.