बेळगाव शहराला नाट्य संस्कृतीची मोठी परंपरा आहे. पण गेल्या काही वर्षात ही नाट्य परंपरा खंडित झाली आहे. ही परंपरा कायम ठेवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या बेळगाव शाखेने
नाट्यदिंडी हा उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून वर्षभरात नाट्य विषयक कार्यक्रम करणार असल्याची माहिती
बेळगाव शाखेच्या अध्यक्षा विणा लोकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. नाट्यकर्मी प्रा .संध्या देशपांडे ,पुष्कर ओगले,गीता कित्तूर या पत्रकार परिषदेला उपस्थित होत्या. नाट्यदिंडी उपक्रमाद्वारे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, बेळगाव शाखेच्या वतीने, वार्षिक देणगी भरून नाट्यप्रेमीना सहा नाटके पाहायला मिळणार आहेत.
सदर योजना एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीसाठी, योजनेचे पैसे भरलेल्या सभासदांपुरतीच मर्यादित असेल. योजनेअंतर्गत चार नावाजलेली व्यावसायिक नाटके आणि दोन प्रायोगिक नाटके किंवा एखादा नावाजलेला रंगमंचीय कार्यक्रम, असे एकूण सहा कार्यक्रम दाखवण्यात येतील.
केवळ त्या वर्षभरासाठी, परिषदेकडे भरलेल्या देणगी प्रमाणे, आपल्याला पास मिळेल. दोन महिन्यातून एकदा सादर होणाऱ्या नाटकाची माहिती सादरीकरणाच्या आधी दहा ते पंधरा दिवस दिली जाणार आहे.
साधारण दोन महिन्यांच्या कालावधीत एक नाटक आणण्यात येणार आहे.
https://www.facebook.com/share/v/1MSushwSfS/
https://dmedia24.com/vishwakarma-festival-at-angol-tomorrow/
या योजनेचा शुभारंभ रविवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ रोजी, वरेरकर नाट्यसंघ
टिळकवाडी येथे संध्याकाळी ठीक पाच वाजता होणार आहे.