‘नदीजोड’ जनजागृतीसाठी देशव्यापी सायकल मोहीम…
कोईमतूरच्या मुथू सेल्व्हनकडून जनजागृती
• 15 राज्यांचा प्रवास करून कर्नाटक राज्य निपाणी मध्ये दाखल
श्री विरूपाक्षलिंग समाधी मठ येथे त्यांचे प . पू प्राणलिंग स्वामीजी आणि वेदांतचार्य उदयशास्त्री महाराज आणि ह.भ.प सौ. विजयाताई अडसुले यांचा वतीने स्वागत करण्यात आले.
नदीजोड प्रकल्पासंदर्भातील जनजागृतीसाठी कोईमतूर (तामिळनाडू) येथील २२ वर्षीय बायोमेडिकल इंजिनिअर मुथू सेल्व्हन या युवकाने देशव्यापी सायकल मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत तीन वर्षांत एकूण ३४ हजार कि.मी. प्रवास करण्याचे मुथू याचे ध्येय आहे. महत्त्वाचे म्हणजे मुथूची सायकल विनागियर आहे.
गेल्या दिड वर्षात त्याने 15 राज्यातील 400जिल्ह्यांचा 8 हजार 650 कि.मी. प्रवास पूर्ण केला आहे. नुकताच ते निपाणी समाधी मठ येथे दाखल झाले. त्याचे स्वागत श्री विरूपाक्षलिंग समाधी मठ यांचा वतीने करण्यात आले तसेच ते करत असलेल्या कार्यास शुभेच्छा आणि आर्थिक सहकार्य प. पू प्राणलिंग स्वामीजी यांनी केले मुथूचे वडील बांधकाम कामगार आहेत तर आई गृहिणी असून त्याला बहीण, भाऊ आहे. दीड वर्षापूर्वी २ डिसेंबरला मुथूने आपल्या सायकल मोहिमेची सुरुवात केली. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, लडाख, जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र राज्याचा प्रवास त्याने पूर्ण केला. एक दिवसांपूर्वी ते कर्नाटक मध्ये आले आतापर्यंत त्याने 15 राज्यातील 400जिल्हाना भेट दिली आहे आजपर्यंत 8हजार 650किलोमिटर प्रवास केला आहे यावेळी श्री विरुपक्षालींग समाधी मठाचे प्रमुख सागर श्रीखंडे याना ते यमगर्णी मध्ये भेट झाली त्यांनी समाधी मठ येथे त्याची राहण्याची जेवणाची सोय केली आणि ते करत असलेल्या कार्याची माहिती प. पू प्राणलिंग स्वामीजी याना दिली यावेळी स्वामीजी यांचा हस्ते त्यांनी समाजासाठी नदी जोडप्रकल्प करण्यासाठी असलेल्या कार्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी
ह. भ. प.वेदांतचार्य उदय शास्त्री महाराज, अँड राम चव्हाण,
ह. भ. प ज्ञेनेश्वर माने,सूरज घोडके,संदीप बगाले, दत्ता पाटील,ह.भ प विजयताई अडसुळे,
ह. भ.प जयश्रीताई ,गणेश निर्मळ, सागर श्रीखंडे विकास आर्य उपस्थित होते तसेच समाधी मठ येथील कार्यकर्ते उपस्थित होते.या प्रवास ची सांगता ते देशाचे . पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचा भेटीने मोहिमेची सांगता करणार आहेत असे सांगितले…